आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षे लहान अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपविषयी मलायकाने पहिल्यांदाच सोडले मौन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. मलायका अरोडा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या अनेक बातम्या मीडियामध्ये येत आहेत. दोघंही अनेक वेळा इव्हेंट्स आणि डिनरवर एकत्र दिसतात. दोघांनी पब्लिकली कधीच आपले अफेअर स्वीकारलेले नाही. दोघ पुढच्यावर्षी लग्न करणार असेही वृत्त आहे. रियलिटी शो इंडिया गॉट टॅलेंटमध्येही करणने मलायकाला याविषयी प्रश्न विचारल्यावर तिने उत्तर देणे टाळले होते. पण एका मुलाखतीमध्ये मलायका यावर बोलली आहे. 


अर्जुनसोबतच्या रिलेशनविषयी मलायकाने सोडले मौन 
- 45 वर्षांच्या मलायकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपवर बातचित केली. तिने स्पष्ट काहीच सांगितले नाही, पण जे काही सांगितले त्यावरुन सर्वच स्पष्ट होते.
- मलायकाने सांगितले - "मी अजूनही पर्सनल प्रश्नाचे उत्तर देत नाही. मला पर्सनल लाइफवर बोलयाला लाज वाटते असा याचा अर्थ होत नाही. पण माझ्या पर्सनल लाइफवर बोलताना मला कंम्फर्टेबल वाटत नाही."
- ती म्हणाली - 'माझ्या आयुष्यात काय होत आहे आणि काय नाही याविषयी सर्वांना माहिती आहे. मला स्वतःला याविषयी कुणाला काही सांगण्याची गरज नाही. मी माझे आयुष्य एन्जॉय करत आहे.'
- गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका सतत एकत्र दिसत आहेत. आता दोघंही फोटोग्राफर्सला अव्हॉइड करत नाहीये. अशा वेळी मलायका म्हणाली की, 'माझ्या आयुष्यात काय होत आहे हे सर्वांनाच माहिती आहे.' हे सर्व त्यांच्या समोर येत असलेल्या एकत्र फोटोंकडे इशारा करते.

 

नुकतेच 4 वेळा एकत्र दिसले मलायका-अर्जुन 
1. 20 अक्टोबर - अर्जुन कपूर, परिणिती चोप्रासोबत इंडियाज गॉट टॅलेंज शोमध्ये फिल्मचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. पण तो परिणितीला सोडून मलायकासोबत बसला. तसेच तो स्टेजवर गेला तेव्हा मलायकाचा हात पकडून गेला. दोघांनी एकत्र डान्सही केला.
2. 24 अक्टोबर - मलायकाचा वाढदिवस होता. मलायकाने इटलीमध्ये वाढदिवस साजरा केला. तिथे मिलान एयरपोर्टवर दोघं एकमेकांचा हात पकडून दिसले.
3. 3 नोव्हेंबर - दोघंही शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीमध्ये गेले. पण दोघं वेगवेगळ्या कारमधून पोहोचले.
4. 6 नोव्हेंबर - शाहरुखच्या दिवाळी वार्टीनंतर दोघं एका डिनर डेटवर गेले होते. डिनरनंतर अर्जुन मलायका फोटोग्राफर्सला टाळताना दिसले.

 

16 वर्षांच्या मुलाची आई आहे मलायका 
मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाजसोबत 1998 मध्ये लग्न केले होते. 2017 मध्ये या कपलचा घटस्फोट झाला. दोघांना एक 16 वर्षांचा मुलगा अरहान आहे. मलायकाच्या घटस्फोटानंतर अरबाज सध्या जियॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

बातम्या आणखी आहेत...