आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत लग्नाच्या बातम्या येत असतानाच मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे मलायका अरोरा, GF चा फोटो पाहून स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही अर्जुन कपूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मलायका अरोरा स्वतःपेक्षा 12 वर्षांनी लहान असणाऱ्या अर्जुन कपूरसोबत विवाहबद्ध होणार आहे. मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार पाहिले तर 19 एप्रिलला ख्रिश्चन रीतिरिवाजप्रमाणे लग्न करणार आहेत. यादम्यानच मलायका मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. असे म्हणले जात आहे की, ती लग्नाअगोदर बॅचलर पार्टी एन्जॉय करत आहे. मलायकाने आपले इंस्टाग्राम आणि आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटोज शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये मलायका पूलजवळ दिसत आहे. हा क्लोजअप फोटो आहे, ज्यामध्ये मलायकाने बॅकलेस आउटफिट कॅरी केले आहे. गर्लफ्रेंडचा फोटो पाहून अर्जुन स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. त्याने या फोटोवर, 'Hmmm'. अशी कमेंट केली आहे. 

सोशल मीडिया यूजर्स शादी के बारे में पूछ रहे हैं...
- मलायकाचा फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स तिला लग्नाबद्दल विचारात आहेत. काही जण तर हेही म्हणाले की, आम्हालाही लग्नाला बोलावा. काह्हीनी अर्जुनला मलायकापासून दूर राहण्याचं सल्ला दिला. तसेच काही यूजर्सने मलायकाचा क्लोजअप फोटो पाहून कमेंट केले, 'वय झाले आहे, आता तर चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत आहेत.' काहींनी मलायकाला रिक्वेस्ट केली की, अर्जुनला सोडून दे. 

- अर्जुनसोबत लग्नाबद्दल मलायकाने रिएक्शन दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलायकाने लग्नाच्या बातम्यांना नाकारले आहे. बॉम्बे टाइम्सनुसार, अर्जुनसोबत लग्नबद्दल मलायका म्हणाली, 'Not True'. 

भडकले वडिल बोनी कपूर... 
लग्नाच्या या बातमीवर अर्जुन किंवा मलायका यांच्याकडून कोणतेही ऑफिशिअल कन्फर्मेशन आलेले नाही. पण अर्जुनचे पिता बोनी कपूर या बातमीवर भडकले आहेत. बोनी कपूर यांनी अर्जुन आणि मलायका यांच्या लग्नाच्या बातमीला एक अफवा असल्याचे सांगतले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामध्ये जराही सत्य नाही. दुसरीकडे, कपूर कुटुंबियांच्या एका व्यक्तीचे म्हणणे आहे की, अर्जुनने आत्तापर्यंत आम्हालाही लग्नाबद्दल काहीही सांगितले नाही. जेव्हा तो आम्हाला सांगेल की, तो लग्न करणार आहे. तेव्हा आम्हीही त्याच्या लग्नात सामील होऊ. मात्र तोपर्यंत अर्जुनला त्याच्या लग्नाचा निर्णय घेण्यासाठी एकटे सोडले पाहिजे. बातम्या तर अशाही आहेत की, लग्नात सामील होण्यासाठी करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्याव्यतिरिक्त रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांना आमंत्रणही पाठवले गेले आहे. एवढेच नाही तर दोघांनीही आपल्या कर्मचाऱ्यांनाही पूर्णपणे गुप्तता पाळण्याची ताकीद दिली आहे. मलायकाचे जिथे हे दुसरे लग्न असेल तर अर्जुन कपूरचे पहिलेच. दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे.

मला अर्जुन आवडतो...असाही आणि तसाही... 
काही दिवसांपूर्वी करण जोहरने 'कॉफी विद करन' च्या एका एपिसोडचा प्रोमो लॉन्च केला होता. या एपिसोडसाठी विशेषतः ज्यूरीसाठी चार लोक किरण खेर, मला यका अरोरा, वीर दास आणि मल्लिका दुआ यांना शोमध्ये बोलावले गेले होते. त्यांच्याशी बातचितीदरम्यान करणने विचारले की, सर्वात चांगला परफॉर्मन्स कुणाचा आहे ? उत्तरात किरण अर्जुन कपूरचे नाव घेतात. तर वीर दास आणि मल्लिका दुआ रणवीर सिंहचे नाव घेतात. पण हैराण करणारे उत्तर येते मलायकाचे. ती म्हणते, "मला अर्जुन आवडतो...असाही आणि तसाही" मलायकाचे उत्तर ऐकून बाकीचे जूरी मेंबर्स हैरान होतात तर होस्ट करण जोहरदेखील शॉक होतो.

16 वर्षांच्या मुलाची आई आहे मलायका... 
मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाजसोबत 1998 मध्ये लग्न केले होते. मात्र कपलचे मे 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. दोघांचाही एक 16 वर्षांचा मुलगा आहे - अरहान. मलायकाशी घटस्फोट झाल्यांनतर अरबाज आता जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

बातम्या आणखी आहेत...