आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 46 व्या वर्षी दुस-यांदा बोहल्यावर चढणार मलायका अरोरा, समुद्रकिनारी अर्जुन कपूरसोबत बांधणार लग्नगाठ!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता जगजाहिर आहे. हे दोघे कायम एकत्र दिसत असतात. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने त्याचा वाढदिवस मलायकासोबत परदेशी साजरा केला होता. तेथील दोघांचे फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले होते. तर अर्जुननेदेखील मलायकाच्या वाढदिवशी तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता.  अरबाज खानसोबत घटस्फोटानंतर आता मलायका अर्जुनसोबत लग्न थाटणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. 

इतकेच नाही तर नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये मलायकाने अर्जुनसोबतच्या तिच्या ड्रिम वेडिंगचे सिक्रेट ओपन केले आहे. नेहासोबतच्या बातचितमध्ये मलायकाने सांगितले की, त्यांचे स्वप्नवत लग्न हे एका बीचवर होईल आणि हा एक व्हाइट वेडिंग इव्हेंट असेल. लग्नात एली साबचा गाऊन परिधान करणार असल्याचेही मलायकाने सांगितले. पण हे दोघे लग्न कधी करणार याविषयी मात्र मलायका काहीही बोलली नाही. 

♥️

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

मलायका आणि अर्जुन कायम सोशल मीडियावर एकमेकांचे कौतुक करताना दिसत असतात. अर्जुनने पानिपत या चित्रपटातील त्याचा लूक रिव्हिल केल्यानंतर मलायकाने त्यावर बहुत बढिया अशी कमेंट केली होती. अर्जुनच्या मते तो मलायकाची चांगली छायाचित्रे क्लिक करत नाही , तर मलायका सांगते की, तिचे सर्वात चांगले फोटो अर्जुनच काढत असतो.  

बातम्या आणखी आहेत...