आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: सलमान खानची एक्स-वहिणी मलायका अरोडाचा नवीन आयटम नंबर 'हॅलो-हॅलो' रिलीज झाला आहे. या गाण्यात 45 वर्षांच्या मलायकाचा जबरदस्त परफॉर्मेंस दिसतोय. हे गाणे डायरेक्टर विशाल भारव्दारचा आगामी सिनेमा 'पटाखा'मध्ये पाहयला मिळणार आहे. हे गाणे 2010 मध्ये आलेल्या 'दबंग' च्या हिट आयटम नंबर 'मुन्नी बदनाम'प्रमाणे ट्रीट करण्यात आले आहे. गुलजार यांनी लिहिलेल्या या गीतांना विशाल भारव्दाजने संगीत दिले आहे. तर त्यांची पत्नी रेखा भारव्दाजने हे गाणे गायले आहेत.यू-ट्यूबवर हे गाणे अवघ्या 24 तासाताच्या आत कोटींपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आले.
अरबाजसोबत घटस्फोटानंतर मलायकाचा पहिला आयटम नंबर
- मे 2017 मध्ये मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला. यानंतर हा तिचा पहिला आयटम नंबर आहे. मलायकाने शेवटचा आयटम नंबर 2015 मध्ये आलेल्या 'डॉली की डोली'मध्ये केला होता. या चित्रपटाचे डायरेक्टर अभिषेक डोगरा होते.
28 सप्टेंबरला रिलीज होणार 'पटाखा'
- 'पटाखा' हा दोन बहिणींमधील भांडणावर आधारित कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. राधिका मदान, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर, सानंद वर्मा आणि विजय राज या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.