आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा 12 वर्षांनी लहान अर्जुनसोबत दिसली मलायका, दोघांना एकत्र बघून यूजर्स उडवत आहेत खिल्ली, एक जण म्हणाला, 'बॉलिवूडमधील सर्वात बकवास जोडी' : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मलायका अरोरा अलीकडे तिच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत डिनर डेटवर स्पॉट झाली होती. दोघे बुधवारी रात्री मुंबईतील वांद्रस्थित एका रेस्तराँबाहेर पडताना दिसले. मीडिया फोटोग्राफर्सना बघून अर्जुन कधी खाली मान घालून चालताना तर कधी मलायकाला आधार देताना दिसला. यावेळी अर्जुन फॉर्मल लूकमध्ये तर मलायका ब्लॅक कलरच्या अटायरमध्ये दिसली. यापूर्वीही हे दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसले आहेत. अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही. पण दोघे पुढील वर्षी एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो बघून यूजर्स त्यांची खिल्ली उडवण्याची संधी सोडत नाहीयेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले,  'ही बॉलिवूडची सर्वात बकवास जोडी आहे.' तर आणखी एका यूजरने दोघांना वर्स्ट कपल म्हटले आहे. 


अशा प्रकारच्या येत आहेत सोशल मीडियावर यूजर्सच्या कमेंट्स...
-  हे दोघे संपूर्ण दिवस एकत्रच फिरत असतात का? दोघांना दुसरं काहीच काम नसतं का?
- अर्जुन कपूरचे डोके फिरले आहे.
- अर्जुन वेडा झाला आहे.
- मॉमसोबत अर्जुन...
- अर्जुनला काय हिच गवसली...
- मला हे कपल मुळीच आवडत नाही. अर्जुन दुसरी कुणी मिळाली नाही का?

 

खासगी प्रश्नांची उत्तरे देणे टाळते मलायका...
मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते, 'मी कधीही खासगी प्रश्नांची उत्तरे देत नाही. याचा अर्थ मला माझ्या खासगी आयुष्यावर बोलायला लाज वाटते, असा होत नाही. पण मी माझ्या वैयक्तिक गोष्टींवर बोलताना कम्फर्टेबल नसते.' 


- ती पुढे म्हणाली होती, 'माझ्या आयुष्यात काय घडतंय आणि काय नाही, हे मला लोकांना सांगणे महत्त्वाचे वाटत नाही. मी माझे आयुष्य एन्जॉय करते.' 

बातम्या आणखी आहेत...