आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Malaika Arora Said About Her Friendship With Arbaaz Khan 'He Is Father Of My Son, I Cannot Ignore Him'

अरबाजसोबतच्या मैत्रीबद्दल मलायका म्हणाली - 'तो माझ्या मुलाचा पिता आहे, त्याला दुर्लक्षित करू शकत नाही' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मलायका अरोराचे म्हणणे आहे की, अरबाज खान तिच्या मुलाचा पिता आहे. त्याला उपेक्षित, दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही किंवा कायमचे विसरलेही जाऊ शकत नाही. ती एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत होती. तिची बहीण अमृतादेखील तिच्यासोबत होती. मलायकाला विचारले गेले होते की, घटस्फोटानंतरही तिच्या आणि तिच्या बहिणीच्या अरबाजसोबत असलेल्या नात्यामध्ये कोणताच बदल झाला नाही, कसे काय ? 
 

'नाती एका रात्रीत बनत नाहीत' - मलायका
उत्तर देताना मलायका म्हणाली, "नाती एका रात्रीत बनत नाहीत. ते बनण्यासाठी काही वेळ लागतो. ते सर्वांसाठी विशेष आणि वैयक्तिक असते. तुम्ही ती नाती अशीच मोडू शकत नाही. ते एक वेगळेच जोडले जाणे आहे. जे माझे आई वडिल, बहीण आणि बहिणीच्या पतीसोबत आहे. अरबाज कुणी अशी व्यक्ती तर नाही की, त्याला माझ्या घरचे असेच सहज ओळखतात. तो माझ्या आई वडिलांसाठी मुलासारखा आहे, बहीण आणि तिच्या पतीसाठी मित्रासारखा आहे, कुटुंबासारखा आहे. अखेर तो माझ्या मुलाचा पिता आहे. त्याला उपेक्षित, दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही किंवा कायमचे विसरलेही जाऊ शकत नाही."
 

'मावशीच्या जास्त जवळचा आहे मुलगा'
मलायका आणि अरबाजने 2017 मध्ये पाले नाते संपवले. त्यांचा 16 वर्षांचा मुलगा अरहान आहे. मलायका म्हणते की, अरहान तिच्यापासून काहीही लपवत नाही. मलायका म्हणते, "त्याची एक गर्लफ्रेंड आहे की 10, हे सर्व तो अमृताला सांगतो. तो आपल्या मावशीच्या जास्त जवळचा आहे."
 

अर्जुन कपूरसोबतच्या नात्याबद्दलही बोलली मलायका...  
मलायका अर्जुन कपूरसोबतच्या आपल्या नात्याबद्दल म्हणाली की, एक वेळ अशी आली की, अफवा आणि अडथळे जरा जास्तच समोर येऊ लागले. विशेषतः तिच्या लग्नबद्दलही खूप गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. तेव्हा तिने आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलायचे ठरवले. लग्नाच्या प्रश्नावर ती म्हणाली की, सध्या तरी ते एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मलायका म्हणाली, "सर्वांना आमच्या लग्नाची एवढी घाई का आहे ? ते जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होईल."

बातम्या आणखी आहेत...