आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरसोबत अफेयरमुले चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्न करणार आहेत. मात्र कपलने लग्नाच्या या चर्चेवर अजूनही काहीही रिअक्शन दिलेली नाही. याचदरम्यान मलायकाने सोशल मीडियावर आपले काही फोटोज शेयर केले आहेत. फोटो पाहिल्यानंतर यूजर्स तिची खूप खिल्ली उडवत आहेत.
एका व्यक्तीने तर मलायकाला विचारले, लग्न केव्हा आहे ?
एका फोटोमध्ये मलायका यलो कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि मलायकाचा ड्रेस हवेमध्ये उडत आहे, अशात एका यूजरने लिहिले, कमाल आहे, हवेने तुझा ड्रेस उडत आहे. पण केस नाही. तसेच एका व्यक्तीने मलायकाच्या दुसऱ्या फोटोला पाहून म्हातारी बाई म्हणले. या फोटोमध्ये मलायका मालदीवच्या कोणत्यातरी बीचवर दिसत आहे.
लग्नासाठी तयार आहे अर्जुन...
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा इव्हेंट्समध्ये एकत्र दिसतात. मीडियामध्ये त्यांचे फोटोज खूप व्हायरल होत आहेत. तरीही त्यांनी मीडियासमोर अद्याप आपले नाते स्वीकारलेले नाही. मागे जेव्हा अर्जुन करण जोहरच्या चॅट शो कॉफी विद करणमध्ये गेला होता तेव्हा तो म्हणला होता - आता मी लग्नासाठी तयार आहे.'
अर्जुनसोबत नाते स्वीकारले आहे मलायकाने...
मलायका अरोराने इशाऱ्यातच का होईना पण अर्जुन कपूरसोबतचे नाते स्वीकारले आहे. 'कॉफी विद करण' मध्ये मलायकाने सांगितले होते की, ती कुणासोबततरी रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका आणखी एका स्टेटमेंटमध्ये म्हणाली होती की, तिला अर्जुन आवडतो असाही आणि तसाही. जर हे सर्व स्टेटमेंट्स पहिले गेले तर याने हेच सांगितले जाऊ शकते की, हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.
प्रियांका-करिनाने कंफर्म केले होते डेट करत आहेत दोघे...
काही दिवसांपूर्वी कॉफी विद करण शोमध्ये प्रियांका चोप्रा आणि करिना कपूरने अर्जुन-मलायकाच्या रिलेशनशिपविषयी कंफर्मेशन दिले होते. करणने त्यांना प्रश्न विचारला होता की, त्यांना बॉलिवूडमधील एखाद्या गॉसिपबद्दल महित आहे का ? यावर प्रियांका चोप्राने उत्तर दिले होते की, तिला माहित आहे की, मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.