Home | Gossip | malaika arora tell her pain of divorce to kareena kapoor

जेव्हा करिनासमोर मलायकाने व्यक्त केले होते घटस्फोटाचे दुःख, म्हणाली होती, 'मी आणि अरबाज एकमेकांना आनंद देऊ शकत नव्हतो'

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 01:21 PM IST

आमची नाराजी फॅमिली आणि इतर लोकांसाठीही नुकसानदायक होती - मलायका... 

 • malaika arora tell her pain of divorce to kareena kapoor

  मुंबई : मलायका अरोरा सध्या 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि काही दिवसांपूर्वी व्हॅकेशनसाठी मालदीवलाही जाऊन आले आहेत. काही दिवसांपूर्वी मलायका अरोराने आपली मैत्रीण करिना कपूरला आपल्या आणि अरबाज नात्याविषयी काहीतरी सांगितले होते. मलायकाने करिना कपूरला तिचा शो 'व्हॉट वुमन वॉन्ट' मध्ये सांगितले होते की, मलायका आणि अरबाज दोघेही या नात्यात खुश नाहीत.

  मलायकाने घटस्फोटाच्या आदल्या रात्रीबद्दल सांगत म्हणाली, ''घटस्फोटाच्या एक दिवस अगोदर संपूर्ण कुटुंब एकत्र बसले होते. मला विचारले जात होते - मी खरंच माझ्या निर्णयाबद्दल 100% शुअर आहे का. हे ते शब्द होते, जे मी सर्वांसोबत आणि साफ साफ ऐकले होते.'' मलायकाने सांगितले, ''हे खरे आहे की, एका पुरुषासाठी घटस्फोटानंतर पुढे जाणे सोपे असते. पण मी जशी व्यक्ती आहे माझ्यासाठी आनंद जास्त महत्वाचा आहे. या सिचुएशनमध्ये आम्ही दोघेच होतो. आम्ही दोघेही एकमेकांपासून खुश नव्हतो आणि याचा परिणाम प्रत्येकावर होत आहोत, जे आमच्या आसपास असायचे. जेव्हा एक कपल सोबत राहूनही खुश नाही राहू शकत तेव्हा त्यांच्या मुलासाठी हे असे वातावरण खूप नुकसानकारक असते.'' काही दिवसांपूर्वी मालदीवहुन परतल्यावर अर्जुन आणि मलायका मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलबाहेर दिसले होते. त्यांनतर दोघे चंकी पांडेच्या पार्टीमध्ये एकत्र दिसले, जिथे हे कपल एकाच कारमधून आले होते.

  अर्जुनसोबत नाते स्वीकारले आहे मलायकाने...
  मलायका अरोराने इशाऱ्यातच का होईना पण अर्जुन कपूरसोबतचे नाते स्वीकारले आहे. 'कॉफी विद करण' मध्ये मलायकाने सांगितले होते की, ती कुणासोबततरी रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका आणखी एका स्टेटमेंटमध्ये म्हणाली होती की, तिला अर्जुन आवडतो असाही आणि तसाही. जर हे सर्व स्टेटमेंट्स पहिले गेले तर याने हेच सांगितले जाऊ शकते की, हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

  प्रियांका-करिनाने कंफर्म केले होते डेट करत आहेत दोघे...
  काही दिवसांपूर्वी कॉफी विद करण शोमध्ये प्रियांका चोप्रा आणि करिना कपूरने अर्जुन-मलायकाच्या रिलेशनशिपविषयी कंफर्मेशन दिले होते. करणने त्यांना प्रश्न विचारला होता की, त्यांना बॉलिवूडमधील एखाद्या गॉसिपबद्दल महित आहे का ? यावर प्रियांका चोप्राने उत्तर दिले होते की, तिला माहित आहे की, मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Trending