आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंचपासून डिनरपर्यंत उकडलेल्या भाज्या खाते मलायका, वर्कआउट आणि हेल्दी फूड व्यतिरिक्त आणखी एक Secret

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मलायका अरोरा आज (23 ऑक्टोबर) 45 वर्षांची झाली आहे. वयाच्या या टप्प्यावरही एक मुलाची आई असूनही मलायका एकदम फिट दिसते. मलायका स्वतःला फिट ठेवण्यासाठी बराच वेळ जिममध्ये वर्कआऊट करते. आता मलायकाने स्वतःचे योगा सेंटरही उघडले आहे. एका मुलाखतीमध्ये मलायकाने आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले. डाएटमध्ये पालेभाज्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे तिने सांगितले होते. याशिवाय ती अँटी ऑक्सीडेंट फूडचा वापर ती करत असते. मलायका वर्कआउटनंतर जास्तीत जास्त हेल्दी स्नॅक्स खाणे पसंत करते.


अशाप्रकारे होते दिवसाची सुरुवात...
- मलायका आपल्या दिवसाची सुरुवात हेल्दी स्मूदी करते. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिते. त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने अर्धी बाटली कोमट पाणी पिते. ब्रेकफास्ट राजाप्रमाणे, लंच प्रिन्सप्रमाणे आणि डिनर गरीबासारखे करावे, या उक्तीवर तिचा विश्वास आहे.


साखर आणि स्मोकिंगपासून दूर राहते
- मलायकाला पास्ता अतिशय पसंत आहे. ती गव्हाची पेस्ट खाते. शिवाय दररोज बादाम मिल्क, विलायची पावडर आणि शहदसोबत ओट्स खाणे ती पसंत करते. सोबतच डिटॉक्स ज्युस तिला आवडतो. शरीरातील आर्यनचे प्रमाण वाढवण्यासाठी ती ज्युस पीते. 


- मलायकाला गोड पदार्थ आवडतात. मात्र गोड पदार्थ खाण्यासाठी तिने आठवड्यातून केवळ एकच दिवस म्हणजे रविवार या दिवसाची निवड केली आहे. संडेला ती स्वतःला ट्रीट देते आणि डाएट फ्री राहते. यादिवशी ती हवं तेवढे स्वीट्स आणि केक खाते. इतर दिवशी जर गोड खाण्याची इच्छा झाली, तर ती गुळ किंवा टी-केक खाते.


- मलायका सांगते, तिला 'सी फूड्स' अधिक आवडतात. संतुलित आहारावर तिचा भर असतो.  नारळ पाणी ती नित्यनेमाने पिते. हार्ड ड्रिंक्स आणि स्मोकिंगपासून ती स्वतःला कायम दूर ठेवते. 


योगासोबतच डान्स आणि किक बॉक्सिंग करते मलायका
मलायका अनेक प्रकारचे आउटडोर स्पोर्ट्स खेळते. सोबतच रोज अर्धा तास स्विमिंग, सायकलिंग आणि जॉगिंग ती करते. फिटनेस शेड्युलमध्ये योगा, डान्स, वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंगचा समावेश असतो. 


आठ तास झोपते 
- दररोज ताजेतवाणे राहण्यासाठी 7-8 तासांची झोप घेण्यावर मलायकाचा विश्वास आहे.  
- मलायका रोज रात्री 8 वाजता जेवण करते. झोपण्याच्या दोन ते तीन तासांपूर्वी जेवण होणे गरजेचे आहे, त्यामुळे तुमचे डाएजेशन नीट राहते आणि पोटसुद्धा स्लिम राहते, असे मलायका सांगते. 

बातम्या आणखी आहेत...