आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये मलायका अरोराचा किलर अंदाज, रेड कार्पेटवर दिसला खास अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोराचा हॉट अंदाज... - Divya Marathi
मलायका अरोराचा हॉट अंदाज...

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची 'मुन्नी' अर्थातच अभिनेत्री मलायका अरोरा आता रुपेरी पडद्यापासून दूर आहे, पण आपल्या लव्ह लाइफमुळे ती लाइमलाइट एकवटतेय. अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे मलायका सध्या चर्चेत आहे. दोघेही एकत्र क्वालिटी वेळ घालवताना दिसतात. खासगी आयुष्यासोबतच मलायका आपल्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. अलीकडेच तिची काही खास छायाचित्रे समोर आली आहेत, जी बघून नक्कीच तुमचे होश उडतील. 

मलायका मंगळवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी रेड कार्पेटवर मलायकाचा जलवा बघायला मिळाला. शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसली. तिचा ग्लॅमरस आणि हॉट अवतार लक्षवेधी होता. स्टाइल क्वीन नावाने प्रसिद्ध असलेल्या मलायकाचा हा अंदाज अगदी बघण्यासारखा होता. मेकअपसोबत न्यूड कलरचे लिपस्टिक आणि हाय पोनीने तिने आपला लूक पूर्ण केला. तिचा हा अंदाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा लूक बघून तिचे चाहते नक्कीच पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतील हे काही वेगळे सांगायला नको.