आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलाकंदचा घेराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात वसाहतवादी शासनादरम्यान मलाकंद प्रांताच्या उत्तर-पश्चिम सीमेपर्यंत कबिल्यांनी 26 जुलै ते 2 ऑगस्ट 1897 पर्र्यंत ब्रिटिश छावणीला घेराव घातला होता. त्याला मलाकंदचा घेराव या नावाने ओळखले जाते. ब्रिटिशांनी अफगाणिस्तान आणि ब्रिटिश भारतामध्ये 1519 मैल दूर सीमारेषा आखत कबिल्यांच्या जमिनीची विभागणी केली. त्यामुळे पश्तून नाराज होते. 26 जुलै 1897 रोजी सुमारे 10 हजार सैनिकांनी ब्रिटिश छावणीला घेराव घातला. ब्रिटिश सेना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये तैनात होती.या तुकड्यांनी विशाल पश्तून सैन्याला रोखले. शेवटी 2 ऑगस्ट रोजी एक ब्रिटिश तुकडी मलाकंद येथे पोहोचली आणि पश्तूनचा घेराव संपुष्टात आला.