आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोन ११ चे डिझाइन आपल्या कुर्तीसारखे म्हटल्याने मलाला ट्रोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूएन / नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझई बुधवारी एका टि्वटवरून ट्रोल झाली. टि्वटमध्ये तिने आयफोन ११ चे डिझाइन आपल्या कुर्तीपासून तयार करण्यात आल्याचे म्हटले होते. यासाठी एक छायाचित्रही तिने शेअर केले होते. यावर पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माथिरा खान संतापली. ती म्हणाली, तुला आयफोनवर टि्वट करताना चांगले वाटते. काश्मीर व प्रियंका चोप्राबद्दल बोलताना तुला अडचण वाटते.
 
याशिवाय पाकिस्तानातील अनेक नेटिझन्सनी तिला चार खडे बोल सुनावले. मलाला गेल्या पाच दिवसांपासून ट्रोल होते आहे. तिने काश्मीर मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला असता, कर्नाटकातील भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे म्हणाल्या, नोबल विजेतीस आवाहन करते की, तिने पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजाच्या समस्या ऐकून घ्याव्यात. काही वेळ त्यांच्यासाठीही काढावा. तेथील अल्पसंख्याकांचे पाकिस्तानात जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. त्यांचा छळ होतो आहे, असे म्हटले. काश्मीरमध्ये विकासासाठी अनेक योजना आणल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी सुनावले आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...