आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Malang' Makers Shared Anil Kapoor's Look, Daughter Sonam Kapoor Said He Is Still 21 Year Old

'मलंग'च्या निर्मात्यांनी शेअर केला अनिल कपूरचा लूक, मुलगी सोनम म्हणाली - ते आजही 21 वर्षांचे आहेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 24 डिसेंबर रोजी अनिल कपूर यांनी आपला 63 वा वाढदिवस साजरा केला. याचेच औचित्य साधत आगामी 'मलंग' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील त्यांचा लूक शेअर केला. ज्यामध्ये अनिल कपूर यांनी पोलिस अधिका-याचा ड्रेस आणि गॉगल घातला आहे. सोबतच त्यांच्या नेमप्लेटवर अनजनेय अगाशे हेनाव लिहिलेले आहे. 'मलंग' व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच 14 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल.

अनिल कपूरसह आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू आणि दिशा पाटणीही 'मलंग'मध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करीत आहेत. टीम अलीकडे एकत्र पार्टी करताना दिसली जिथे प्रत्येकजण स्टायलिश लूकमध्ये दिसला. या पार्टीचे आयोजन स्वत: अनिल कपूर यांनी केले होते. या चित्रपटाचे शूटिंग गोवा आणि मॉरिशसमधील सुंदर लोकेशनवर केले जात आहे. भूषण कुमार, टी-सीरिजचे कृष्णा कुमार, लव फिल्म्सचे लव रंजन,  अंकुर गर्ग आणि नॉर्दर्न लाइट्स एंटरटेन्मेंटचे जय शेवकरमणि या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.

  • सोनमने लिहिले - नेहमी तरुण आहात तुम्ही

सोनमने वडिलांना शुभेच्छा देणारा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनिल सोनम आणि रियासोबत केक कापत आहे. फोटोसह सोनमने लिहिले, "सर्वात प्रेरणादायक, समजूतदार आणि कुटुंबातील सर्वात उत्साही सदस्य. माझी सपोर्ट सिस्टम आणि माझी शक्ती राहिल्याबद्दल पप्पा धन्यवाद. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. हॅपी 21 st, नेहमीच तरूण, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. "

बातम्या आणखी आहेत...