आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुलकरनंतर निविन करणार बॉलीवूडमध्ये प्रवेश, लवकरच दिसणार एका हिंदी चित्रपटात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: दक्षिणेतील अनेक सुपरस्टार नेहमीच बॉलीवूडमध्ये अभिनय करत आले आहेत. नुकतेच सुपरस्टार मामुटीचा मुलगा दुलकर सलमानने देखील बॉलीवूडमध्ये "कारवां' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. त्याच्या पाठोपाठ आता निविन पॉलीदेखील पदार्पण करणार आहे. 


बॉलीवूडमध्ये सध्या प्रादेशिक चित्रपटसृष्टीतूनही अनेक अभिनेते पदार्पण करत आहेत. मामुटी, दुलकर सलमान आणि मोहनलाल यासारख्या अनेक अभिनेत्यांनी यापूर्वीच बॉलीवूडमध्ये काम केलेले आहे. या वर्षी रिलीज झालेला चित्रपट 'कारवां'द्वारे दुलकरने हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. आता कोचीनच्या राहणाऱ्या निविन पॉलीनेदेखील हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास पसंती दर्श‌वली आहे. लवकरच त्याचा चित्रपट "कायमकुलम कोचुन्नी' रिलीज होणार आहे. हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट असून त्याची कथा एकोणिसाव्या शतकामधील आहे. यामध्ये तो त्रावणकोर राज्यातून हाकलून देण्यात आलेल्या एका व्यक्तीचे पात्र साकारत आहे. हे पात्र श्रीमंतांना लुटून त्यांच्याकडील धन-संपत्ती गरिबांना देते. वृत्तानुसार, त्याने आपल्या आणखी एक चित्रपट 'मूथन'ची (मोठा भाऊ) डबिंग सुरू केली आहे. हा चित्रपट हिंदी आणि मल्याळम दोन्ही भाषांमध्ये डब होणार आहे. याचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. निविनचे म्हणणे आहे की, 'सर्व कलावंतांनी सीमा ओलांडली पाहिजे आणि ज्यामध्ये ते पारंगत नाहीत अशा भाषांमध्ये अभिनय करत स्वत: आव्हान स्वीकारले पाहिजे. कोणत्याही मल्याळम अभिनेत्याला इथर भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. मात्र, ईश्वराच्या कृपेने मी इतर भाषांमध्ये काम करू शकतो. एकाच ठिकाणी बसून आरामात काम करत बसण्यापेक्षा काहीतरी नवीन करत राहावे.' 


दुसरीकडे दुलकरदेखील लवकरच सोनम कपूरसोबत 'द झोया फॅक्टर' या चित्रपटातून झळकणार आहे. त्याचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'कारवां'मधील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. त्याच्या पूर्वी त्याचे वडील मामुटी यांनीदेखील बॉलीवुडमध्ये काम केले आहे. त्यांनी १९९३ मध्ये 'धरतीपुत्र' चित्रपटामध्ये अभिनय केला होता. २००८ मध्ये रिलीज झालेल्या 'हल्ला बोल'मध्ये त्यांनी कॅमियो केला होता. तसेच मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार मोहनलाल यांनीदेखील बॉलीवूडमध्ये काम केले आहे. २००२ मध्ये आलेल्या 'कंपनी' चित्रपटात त्यांनी पोलिस अधिकाऱ्याचे पात्र साकारले होते. नंतर ते रामगोपाल वर्मांच्या 'आग'मध्येही दिसले. 

बातम्या आणखी आहेत...