आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Malaysia King Resigns Amid Rumours Of Marriage To Ex Russia Beauty Queen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियन ब्युटी क्वीनसोबत विवाह करून चर्चेत आलेल्या मलेशियन सुलतानने केला पदाचा त्याग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर - मलेशियाचे सुलतान मोहम्मद पाचवे यांनी आपल्या राजेशाहीचा त्याग करत राजीनामा दिला आहे. रशियन ब्युटी क्वीनसोबत विवाह करून ते नुकतेच चर्चेत आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते सुटीवर होते. त्यांच्या गैरहजेरीत विविध प्रकारच्या चर्चा उडाल्या होत्या. त्यांनाच विराम लावताना शाही घराण्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या राजाच्या पदत्यागाची अधिकृत घोषणा केली आहे. मलेशियाला 1957 मध्ये ब्रिटनच्या पारतंत्र्यापासून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आतापर्यंत आपल्या पदाचा त्याग करणारे सुलतान मोहम्मद मलेशियाचे पहिलेच राजा ठरले आहेत.


शाही घराण्यातून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, "नॅशनल पॅलेस मलेशियाचे 15 वे राजा सुलतान मोहम्मद यांच्या राजीनाम्याची घोषणा करत आहे. 6 जानेवारी 2019 पासून त्यांचा राजीनामा लागू होत आहे." परंतु, राजाने पद का सोडले याचे कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. डिसेंबर 2016 पासूनच या शाही घराण्याच्या वारसदाराचा वाद सुरू होता. तसेच नोव्हेंबर महिन्यात सुलतान मोहम्मद यांनी वैद्यकीय कारणास्तव अचानक सुटी घेतली होती. परंतु, त्यांनी ही रजा प्रत्यक्षात आपल्या लग्नासाठी घेतल्याचे समोर आले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही फोटो सुद्धा समोर आले होते. त्यांनी माजी मिस रशिया ओक्साना वोएवोदीना हिच्याशी विवाह केल्याची चर्चा आहे. त्यावर शाही घराण्याने अद्याप अधिकृत माहिती दिली नाही.