international Special / व्यापाऱ्याने 'जॅग्यूआरल' 4600 टॉय-कार लावून दिला अनोखा लूक


दतुक यांना वयाच्या 13 व्या वर्षांपासूनच टॉय-कार जमा करण्याची छंद आहे

दिव्य मराठी वेब टीम

May 26,2019 05:32:00 PM IST

इंटरनॅशनल डेस्क- मलेशियातील एका व्यवसायिकाने आपल्या कारवर 4600 पेक्षा जास्त खेळण्यातील गाड्या लावून कलरफूल लुक दिला आहे. या व्यापाऱ्याचे नाव दतुक सेरी असून त्यांनी हा प्रयोग आपल्या जॅग्यूआर एस-टाइपवर केला आहे. दतूक हे फायनांशिअल जीनियस ग्रुपचे सीईओ आहेत आणि त्यांना टॉय कार जमा करण्याचा छंद आहे.


5 हजार मिनिएचर कार
नुकतेच या कलरफूल कारचे फोटो व्हायरल झाले. दतुकनुसार, ते वयाच्या तेराव्या वर्षांपासून हॉट व्हील मिनिएचर गाड्या गोळा करत आहेत. सध्या त्यांच्याकडे अशा प्रकारच्या 5 हजार टॉय कार आहेत. त्यापैकी, 4600 कारचा वापर आपल्या जॅग्यूआर एस-टाइपला सुंदर बनवण्यासाठी केला आहे.

दतुकनुसार, त्यांच्याकडे टॉय कारची संख्या खूप जास्त झाल्यामुळे देखरेख करण्यात खूप अडचण येत होती. त्यामुळे आपल्या कारवर या गाड्या सजवण्याचा निर्णय घेतला. आणि या सर्व टॉय-कार ग्लूच्या मदतीने आपल्या जग्वारवर लावण्यात आले. या नव्या लुकमुळे त्यांच्या फॅशन सेंसमध्ये फरक दिसून येत आहे.

कुठेही पार्क करता येत नाही कार
दतूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार दिसायला जेव्हढी वेगळी आहे तितकिच या कारची देखरेख ठेवणे कठीण आहे. त्यांना ही कार कुठेही पार्क करता येत नाही, कारण यामध्ये लावण्यात आलेल्या टॉय कार चोरी जाण्याची भिती असते. आपण अशा प्रकारचे प्रयोग करून आकर्षणाचे केंद्र बनू शकता.

X
COMMENT