आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियाच्या राजाने २३ वर्षांनी लहान तरुणीसाठी सोडले सिंहासन, एका वर्षातच झाला घटस्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को/क्वालांलांपूर-मलेशियाचे माजी राजे सुल्तान महंमद -वी यांनी आपल्यापेक्षा २३ वर्षांहून लहान असलेल्या रशियन ब्यूटी क्वीनशी लग्न करण्यासाठी राजसिंहासन सोडले होते. मात्र, लग्नास एक वर्ष पूर्ण होण्याआधीच दोघांनी घटस्फोटही घेतला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुल्तान यांनी गेल्या वर्षी मॉस्कोमध्ये ओक्साना विवोदिनाशी (२७) लग्न केले. लग्नानंतर ओक्सानाने इस्लाम धर्म स्वीकारला व आपले नाव रिहाना ओक्साना पेट्रा असे ठेवले. ओक्सानाला मे महिन्यात मुलगाही झाला. त्याचे नाव इस्माईल लायन आहे. मुलाच्या जन्मानंतर काही आठवड्यांतच दोघांत घटस्फोट झाल्याचे वृत्त आले. लोकांना धक्काच बसला. ही प्रक्रिया २२ जूनपर्यंत चालली. आता दोघेही विभक्त राहत आहेत.