आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव ब्लास्ट; आतड्यातील संक्रमणामुळे रुग्णालयात भर्ती झाल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर, कोर्टाने दिला होता हजर होण्याचा आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मालेगाव ब्लास्टच्या आरोपी आणि भाजपच्या नवनिर्वाचीत खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना बुधवारी रात्री प्रकृती खराब झाल्यामुळे भोपाळच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 3 जूनला मुंबईच्या एनआयए कोर्टाने प्रज्ञा यांना दर आठवड्याला हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रज्ञा यांवा 7 जूनला हजर राहायचे होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आतड्यातील संक्रमण, कंबरेमध्ये त्रास आणि हाय ब्लड प्रेशरमुळे रूग्णालयात दाखल करावे लागले. रूग्णालायातील डॉक्टर अजय मेहता यांनी सांगितले की, प्रज्ञा यांच्या आतड्यात सुज आणि ब्लड प्रेशर वाढले होते, त्यामुळे एक किंवा दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत राहावे लागेल.


कोर्टात दर आठवड्याला हजेरी लावण्याचे आदेश 
3 जूनला मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना आठवड्यातून एक वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. प्रज्ञा यांना आजारपण आणि संसदेतील औपचारिकता पूर्ण करण्याचे कारण देत हजेरीपासून सुट मागितली होती, मात्र विशेष न्यायालयातील न्यायाधिशांनी ही मागणी अमान्य केली.


मालेगाव ब्लास्टमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला होता
29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसला दिला होता. 24 ऑक्टोबर, 2008 या प्रकरणात स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा सिंह यांना अटक करण्यात आली होती, तर 3 आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. एप्रिल 2017 मध्ये साध्वी प्रज्ञा यांना 9 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सशत्र जामीन मिळाला होता.