आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशात गुंगीचे औषध देत चार मुलींवर अत्याचार; मौलाना, त्याच्या पत्नीसह मदतनीस अटकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव  - शहरातील दरेगाव शिवारात असलेल्या मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या चार मुलींवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. अत्याचार करणाऱ्या माैलानासह तिघांना पाेलिसांनी अटक केली असून त्यांना ५ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. 

 

दरेगाव शिवारात झैनब अख्तरूल नावाने मुलींचा धार्मिक मदरसा चालवला जाताे. या मदरशात ८ ते १६ वयाेगटातील ३९ मुली शिक्षण घेतात. मात्र, मदरशात देखरेखीचे काम करणारा माैलाना वकार अहमद जहीर हुसेन अन्सारी हा काही मुलींवर अत्याचार करत हाेता. हा प्रकार एप्रिल महिन्यापासून सुरू हाेता. पीडित दाेघा मुलींनी रविवारी (दि.३०) शहर पाेलिस ठाणे गाठून आपबीती सांगितली. याची दखल घेत पाेलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी मुलींकडे  अधिक चाैकशी केली असता त्यांनी अन्य दाेन मुलीही माैलानाच्या शिकार झाल्याचे सांगितले. तर इतर दाेन मुलींची छेडछाड केली जात हाेती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नवले यांनी तातडीने माैलाना वकार अन्सारी, त्याची पत्नी आसिया वकार अन्सारी व मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सलमा रफियाेद्दीन अन्सारी ऊर्फ खाला यांना अटक केली. तर अन्सारीच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पवारवाडी पाेलिस ठाण्यात बलात्कार व पाेस्काे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

गुंगीचे औषध देत अत्याचार
मौलाना हा पीडित मुलींना साफसफाई करण्याच्या बहाण्याने बोलावून घ्यायचा. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा. पीडित मुलींनी अत्याचाराचा प्रकार माैलानाची पत्नी आसियाला सांगितला. मात्र, आसियाने पतीच्या कृत्याचे समर्थक करत मुलींचा मारहाण केली. मारहाणीच्या भीतीने मुली काही दिवस शांत राहिल्याचे स्पष्ट झाले.