आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिहा यांच्या स्नुषा हिंदू असल्याने पाकिस्तानने त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रतिनिधी पदावरून हटवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : पाकिस्तानने अलीकडेच संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी मलिहा लाेधी यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी मुनीर अक्रम यांची नियुक्ती केली आहे. मलिहा यांच्या मुलाने एका हिंदू मुलीसाेबत विवाह केला आहे. मलिहा यांना पदावरून हटवण्यामागे हे महत्त्वाचे कारण मानले जाते.

काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. त्यातच मलिहा यांच्या हिंदू स्नूषा असण्याचाही मुद्दा मांडण्यात आला. मलिहा यांच्याकडून धाेका निर्माण हाेऊ शकताे, असे पाकिस्तानला वाटत हाेते. मलिहा यांच्या संयुक्त राष्ट्रातील कामगिरीचे खासगी जीवनाच्या आधारे मूल्यमापन केले जात हाेते. मुलाने हिंदू मुलीसाेबत विवाह केल्यावरून मलिहा यांना साेशल मीडियावरून लक्ष्य केले जात हाेते. त्यांना बेइमान असे संबाेधले जात हाेते. त्यातून हितसंबंधातील संघर्ष निर्माण हाेत असल्याचाही आराेप केला जात हाेता. काही लाेकांनी तर त्यांना भारतीय एजंट असेही संबाेधले. मलिहा यांनी मुलाच्या विवाहाविषयी सार्वजनिक पातळीवर काही बाेलण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रातील महासभेच्या बैठकीनंतर परतण्याची माझी याेजना हाेती. २००३ मध्ये लंडनमध्ये पाक उच्चायुक्त बनल्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मलिहा यांनी भावना मांडल्या हाेत्या. पाकिस्तानी मुलीसाेबत मुलाचा विवाह करून देण्याची इच्छा हाेती, असे त्यांनी सांगितले हाेते.

कार्यकाळ पूर्ण झाला हाेता : पाकिस्तान सरकारने या कारवाईबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मलिहा यांना हटवण्यात आलेले नाही. कारण त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळेच त्यांच्या जागी मुनीर अक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इम्रान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेहून परतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मलिहा यांच्या जागी अक्रम यांची नियुक्ती केली हाेती.

सूनबाई दिल्लीकर, बँकेत नाेकरी
मलिहा यांचा मुलगा फैजल यांनी भारतीय वंशाची हिंदू मुलगी गाैरिका गंभीरशी विवाह केला. गाैरिका मूळच्या दिल्लीच्या आहेत. त्यांनी एबीएन एमराे व एचएसबीसी बँकेतही नाेकरी केली आहे. काेलंबिया विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. फैजलच्या विवाहाचे जुने छायाचित्र साेशल मीडियातून शेअर केले जाते.