Local News / Accident: राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकरने व्हॅनला चिरडले; 4 महिला, 2 मुलांसह 13 जणांचा मृत्यू

ही घटना सोमवारी मलकापूर येथील ऑइल रिफायनरीजवळ घडली

प्रतिनिधी

May 20,2019 05:30:22 PM IST

मलकापूर - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर येथे सोमवारी भीषण अपघात घडला आहे. येथे एका भरधाव टँकरने प्रवाशांनी भरलेल्या एका व्हॅनला जोरदार धडक दिली. व्हॅनमध्ये एकूण क्षमतेपेक्षा अधिक जण प्रवास करत होते. अपघात इतका भयंकर होता, की यातील 4 महिला, 2 चिमुकल्यांसह 13 जणांचा मृत्यू झाला. यातील गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घनटास्थळावरून आलेल्या छायाचित्रांमध्ये व्हॅनचा चेंदामेंदा झाला. तर टँकर उलटल्याचे दिसून आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मॅजिक या खासगी वाहनात क्षमतेपेक्षा अधिक 16 जण कोंबून भरले होते. ते मलकापूरच्या दिशेने निघाले होते. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव टँकरने व्हॅनला धडक दिली. या कंटेनरमध्ये केमिकल भरलेले होते. त्यामुळे, बचावकार्यात विलंब झाला. सुरुवातीला या अपघातात 8 जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली होती. परंतु, बचावकार्यात एकूणच 13 मृतदेह सापडले आहेत. या अपघातातील 2 जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती देखील चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे
1. विरेन (6)
2. सतिश शिवरकर (8)
3. सोमीबाई शिवरकर (25)
4. अशोक फिरके (40)
5. नथ्थू चौधरी (45)
6. किसन बोराडे (30)
7. अनिल ढगे (35)
8. छाया खडसे (30)
9. रेखा (17)
10. आरती (18)
11. मिनाबाई (30)
12. प्रकाश भारंबे
13. मेघा भारंबे


जखमींची नावे
1. गोकूळ भालचंद्र बिलोरकर (35)
2. छगन राजू शिवरकर (26)

X
COMMENT