आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Malnutrition: 4 Year Old Severely Malnourished Child Found In Bhopal, Weighs Only 3 Kg

लाजीरवाणी बाब : भोपाळमध्ये आढळला 4 वर्षांचा अतिकुपोषित मुलगा, वजन फक्त 3 किलो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्यप्रदेशच्या जूनापाणी गावात बुधवारी चार वर्षांचा अतिकुपोषित मुलगा आढळून आला. मुलाचे वजन तीन किलोपेक्षाही कमी आहे. अंगणवाडी आणि आशा कार्यकर्तींनी बाळाला अतिकुपोषित मुलांच्या श्रेणीत ठेवले आहे. बुधवारी याची माहिती मिळताच बाल आयोगाचे सदस्य बृजेश चौहान यांनी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मुलाला पोषण पुनवर्सन केंद्रात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

 

मुलाला एनआरसीमध्ये दाखल करण्याबाबत पालक इच्छुक नाहीत
महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी रामगोपाल यादव यांनी सांगितले की, 'आम्ही एका वर्षापूर्वी मुलाला एनआरसी मध्ये भर्ती केले होते. पण मुलाच्या पालकांची येथे दाखल करण्याची इच्छा नाही. यामुळे आम्ही आता काय करू शकतो? सीएमएचओने मुलावर उपचार करण्याचा प्रयत्न केला पण पालकांनी यासाठी तयार दर्शविली नाही.'

 

पोषण आहार प्रकल्पाबाबत राज्य सरकारला खासगी कंपन्यांवरच विश्वास
राज्य सरकारने पोषण आहार प्रकल्प सुरु न करता खासगी कंपन्यांवरच विश्वास दाखवत आहे. धार आणि होशंगाबाद येथे मार्च महिन्यात हे प्रकल्प सुरू करण्यात येणार होते. पण आजपर्यंत ते सुरु झाले नाहीत. आता हा प्रकल्प सुरु करण्याचीन शेवटची तारीख जुलै महिन्यात सांगितली जात आहे.