Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Mama killed, five-year-old niece serious in trucks accident

ट्रक-दुचाकीच्या धडकेत मामा ठार, पाच वर्षांची भाची गंभीर

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 11:06 AM IST

एमआयडीसी वाळूज ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस उपनिरीक्षक उंबरे तपास करत आहेत.

  • Mama killed, five-year-old niece serious in trucks accident

    वाळूज - ट्रकच्या (एमएच ४३ यू ६५७०) धडकेने भाचीला घेऊन दुचाकीवरून (एमएच २० बीबी १६५२) निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. दीपक पूनमचंद महेर (१८, रा. बेंडेवाडी, ता. वैजापूर) असे त्यांचे नाव आहे. भाची वैष्णवी पोपटसिंह सत्तावन (५, रा. जोगेश्वरी) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.

    एमआयडीसी वाळूज ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस उपनिरीक्षक उंबरे तपास करत आहेत. खोजेवाडी फाट्याजवळ अपघात; घाटीत उपचार

Trending