आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata After The Defeat In The Lok Sabha, Expressed Desire To Quit The Post Of Chief Minister

लोकसभेतील पराभवानंतर ममतांना वाटतंय अपमानास्पद, मुख्यमंत्री पद सोडण्याची व्यक्त केली इच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता - मला मुख्यमंत्री पद साेडण्याची इच्छा आहे. मला अपमानास्पद वाटू लागले आहे, असे स्पष्ट करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी राजीनामा देऊ केला.  लाेकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पक्ष पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयाेजित केली हाेती. त्यात त्यांनी मन माेकळे केले. ममतांनी राजीनामा देऊ केला तरी पक्षाने ताे मान्य केला नाही. फेटाळून लावण्यात आला, अशी माहिती ममतांनी नंतर पत्रकारांना दिली. 


भाजपच्या नेतृत्वाखालील रालाेआचा माेठा विजय ही काही चमत्कारिक बाब नाही. उलट देशातील अनेक राज्यांतून विराेधी पक्ष नामशेष झाला. हे पाहणे गरजेचे आहे. ही बाब गंभीर मानली पाहिजे. भाजपने देशात आणीबाणीच्या काळाप्रमाणे परिस्थिती िनर्माण केली आहे, असा आराेप ममतांनी केला आहे.


ममतांची कविता :  सांप्रदायिकेवर माझा विश्वास नाही. सर्व धर्मांत सहिष्णुता आहे. धार्मिक उन्माद वाढू नये असे मला वाटते. मानवतेवर विश्वास असलेल्या धर्मालाच मी मानते, असे ममतांनी ट्विटद्वारे कवितेतून स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १८ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी व त्यांचा पक्ष बिथरला आहे.हत्यांसाठी तृणमूल जबाबदार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.