Home | National | Other State | mamata banerjee calls to leaders for urgent party meeting

लाेकसभेत प. बंगालमधील जागा घटल्याने दीदी धास्तावल्या ; बाेलावली तातडीची बैठक!

वृत्तसंस्था | Update - May 25, 2019, 08:59 AM IST

राज्यात भाजपची दाेनवरून १८ वर उडी

  • mamata banerjee calls to leaders for urgent party meeting

    काेलकाता - लाेकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसचे नेते व खासदारांची तातडीची बैठक आयाेजित केली आहे. त्यात पक्षाची पिछाडी का झाली? यावर विचार केला जाणार आहे.


    आमच्या पक्षप्रमुखांनी विजयी उमेदवारांची बैठक घेण्याचे ठरवले आहे. त्यात जिल्हास्तरीय अध्यक्ष, इतर नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत. बैठकीत निवडणुकीतील निकालाचा ऊहापाेह केला जाणार आहे. पराभूत उमेदवारही बैठकीला उपस्थित राहतील. अशा प्रकारचा निकाल आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. आमच्याविराेधात अशा प्रकारची नाराजी असेल, याचा आम्हाला अंदाजही नव्हता. आम्ही चुका सुधारण्यासाठी आता प्रयत्न केले पाहिजेत. जास्त उशीर हाेण्याच्या आधी या चुका सुधारणे महत्त्वाचे ठरेल. यासाठी शनिवारी ही बैठक हाेणार आहे, असे तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.


    कमळ फुलवणारे पाच शिलेदार
    पश्चिम बंगाल हा ममता बॅनर्जी यांचा गड. यंदाच्या निवडणुकीत भाजपने त्याला सुरुंग लावला. भाजपचे कमळ फुलवण्याच्या कामात पक्षाच्या पाच शिलेदारांचा विजय महत्त्वाचा मानला जाताे. हे सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यात कैलास विजयवर्गीय, शिवप्रकाश, मुकुल राॅय, दिलीप घाेष, अरविंद मेनन यांचा समावेश हाेताे. २०१४ नंतर भाजपने विजयवर्गीय यांना सरचिटणीस पदावर नेमले. ते प्रदेश संघटना व केंद्रातील नेतृत्व यांच्यातील संवाद दुवा म्हणून सक्रिय आहेत. संघाच्या मुशीतून तयार झालेले शिवप्रकाश राज्यातील भाजपच्या बांधणीसाठी महत्त्वाचे ठरले. ते विजयवर्गीय यांना पक्षकार्यात सहकार्य करत. मुकुल राॅय पूर्वाश्रमीचे तृणमूल नेते. २०१७ मध्ये ते भाजपमध्ये सहभागी झाले. गेल्या दीड महिन्यात राॅय यांनी भाजपसाठी महत्त्वाचे कार्य केले. संघटनात्मक काैशल्यामुळे त्यांनी भाजपचे मताधिक्य वाढवले. मुकुल राॅय ममतांचे उजवे हात मानले जायचे. अंदमान-निकाेबारमध्ये संघासाठी काम करणाऱ्या दिलीप घाेष यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आहे. अरविंद मेनन यांची लाेकसभा निरीक्षक पदावर नियुक्ती झाली हाेती. त्यांनी राज्यात तळागाळात भाजप बांधणीचे काम केले.

Trending