आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamata Banerjee News In Marathi, Election Commission

अखेर ममता बॅनर्जी यांचे नरमाईचे धोरण, निवडणूक आयोगाचा आदेश पाळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या कठोर भूमिकेनंतर नरमाईचे धोरण अवलंबिले आहे. आयोगाने सांगितलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यावर ममता यांनी सहमती दर्शविली आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश पाळला नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे, त्यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत तर या अधिकाऱ्यांची नेमणूक असलेल्या जिल्ह्यांमधील निवडणुका रद्द करण्याचा आदेश आयोग देऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले होते.
निवडणूक आयोगाने काल पश्चिम बंगालमधील पाच पोलिस आयुक्त, एक जिल्हाधिकारी यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांनी आयोगाला आव्हान दिले होते. मी पदावर असेपर्यंत कोणत्याच अधिकाऱ्याची बदली होऊ देणार नाही. हिंमत असेल तर बदली करू दाखवाच, असा इशाराच बॅनर्जी यांनी दिला होता.
निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकाने दिलेल्या अहवालानंतर पश्चिम बंगालमधील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असा आदेश देण्यात आला होता.
हा आदेश पाळण्यासाठी आज शेवटचा दिवस होता.