आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने केलेल्या आरोपानंतर ममता दीदींचा मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार, पत्राद्वारे दिली माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे. आधी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते पण माध्यमांचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर त्यांनी आपले मन वळवले. ममताने सांगितले की, माध्यम रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, बंगालमधील हिंसाचारात 54 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भाजपाने केलेला हा दावा साफ खोटा आहे. सोहळ्यात उपस्थित राहणार नसल्याबद्दल ममतांनी मोदींची माफी मागितली आहे. तर दूसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पी विजयन हे सुद्धा शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत. 


बंगालमधील हत्याकांडाचा राजकीय संबंध नाही -  ममता

ममतांनी एक पत्राद्वारे शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहीले की, नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हार्दिक शुभेच्छा. तुमचे आमत्रंण स्वीकारून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार होते. पण गेल्या एक तासापासून भाजप माध्यमांद्वारे दावा करत आहे की, राजकीय हिंसाचारात बंगालमधील 54 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण हे साफ खोटे आहे. बंगालमध्ये कोणतीही राजकीय कारणामुळे हत्या करण्यात आली नाही. हे हत्याकांड कौटुंबिक कलह, एकमेकांमधील वाद आणि वैमनस्यातून झाली आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आमच्याकडे तसे पुरावेही नाहीत. यामुळे मी शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाही.

 

ममतांनी लिहिले की, शपथ ग्रहण लोकशाही साजरी करण्याचा एक अभिमानास्पद क्षण असतो. राजकीय फायद्यासाठी एखाद्या पक्षाची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी या सोहळ्याचा उपयोग करू नये. 
मला क्षमा करा. 
 

 


 

बातम्या आणखी आहेत...