आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षबदल : ममतांचे २, माकपचा एक आमदार भाजपमध्ये, ७ टप्प्यांत ४० आमदार येणार : भाजपचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत प. बंगालमधील १८ जागा पटकावल्यानंतर भाजपने ममता बॅनर्जी यांना आणखी एक जोरदार झटका दिला. भाजपने ममता यांच्या तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार मुकुल राॅय यांचे पुत्र शुभ्रांशू, तुषार कांती भट्टाचार्य आणि ५० नगरसेवकांना आपल्या गटात आणले आहे. त्यामुळे प. बंगालमधील तीन नगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. एकेकाळी ममता यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले मुकुल रॉय यांचे पुत्र शुभ्रांशूही भाजपत दाखल झाले आहेत. शुभ्रांशू यांना पक्षविरोधी कारवायांमुळे यापूर्वीच पक्षातून काढून टाकले आहे. मुकुल रॉय २०१७ मध्ये भाजपवासी झाले होते. भाजपमध्ये प्रवेश करणारे तिसरे आमदार माकपचे देवेंद्र रॉय आहेत. 

 

टीएमसीचे ४० आमदार ७ टप्प्यांत येणार : भाजप 
आमदार-नगरसेवकांना भाजपत प्रवेश देताना पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले की, टीएमसीला आणखी धक्के बसतील. हा तर पहिला टप्पा आहे. ज्याप्रमाणे निवडणूक सात टप्प्यांत झाली होती त्याचप्रमाणे सात टप्प्यांत टीएमसीतील ४० आमदार भाजपत प्रवेश करतील. 


> ममता बॅनर्जी यांनी २०१६ मध्ये २९५ पैकी २११ जागा मिळ‌वल्या होत्या. त्यामुळे दोन आमदार जाण्याने त्यांच्या सरकारला धोका नाही. मात्र, नगरपालिका हातातून निसटल्याने २०२१ मध्ये भाजपसाठी त्या तळाचा आधार ठरू शकतात. हे सर्व त्यासाठीच होत आहे असे मानले जात आहे.