आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mamata\'s Preference On Hindi Language, Mayawati\'s Twitter Account, Priyanka\'s Election Campaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ममतांचा हिंदी भाषेवर भर, मायावतींचे टि्वटर खाते तर प्रियंका यांचा प्रचारमंत्र; प्रियंका तीन वॉर रूममधून ठेवतील निवडणुकीवर लक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता/नवी दिल्ली/लखनऊ- बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधानपदापर्यंत पोहोचता येऊ शकेल यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे आजकाल त्या हिंदीवर भर देत आहेत. आपली प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू असून अन्य पक्षांच्या नेत्यांचेही त्या सल्ले घेत आहेत. 

 

दुसरीकडे मायावतीही या वेळी कोणतीही कसर राहू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. माझा मतदार वृत्तपत्र वाचतो ना टीव्ही पाहतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांची पर्वा करत नाही, असे त्या आतापर्यंत म्हणत होत्या. मात्र, त्यांनी आता टि्वटरवरही पदार्पण केले आहे. भाजपला सोशल मीडियाचा निवडणुकीत झालेला फायदा पाहता आता मायावतींनीही विविध प्रयत्नांसह सोशल मीडियावर आघाडी उघडली आहे. 

 

दुसरीकडे काँग्रेस प्रियंका गांधी यांच्याकडे गेम चेंजरच्या रूपात पाहत आहे. असे असले तरी प्रियंका निवडणूक मोहिमेला फार गाजावाजा न करता अंतिम रूप देऊ इच्छितात. त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला तेव्हा आफ्रिकी किड्याची कथा ऐकवली. हा किडा गोंगाट न करता शत्रूला आतून पूर्णपणे खाऊन टाकतो. याच शैलीत आपण राजकारण करू इच्छित असल्याचे प्रियंका यांनी सांगितले. 


प्रादेशिक पक्षांमध्ये ममता सर्वाधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात 
भारतीय राजकारणात पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दिल्लीतून जातो. आता प्रथमच पश्चिम बंगालमधूनही आव्हान मिळत आहे. यातील रंजक बाब म्हणजे उत्तर प्रदेश व बंगाल दोन्ही ठिकाणांवरून तीन महिला लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत आहेत. ममतादीदी २०१४ मध्ये प. बंगालमधून ४२ पैकी जिंकलेल्या ३४ जागांत कोणत्याही स्थितीत भर घालू इच्छित आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचे पृष्ठभूमी तयार करण्याचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला ८० पैकी केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. बसपला खातेही उघडता आले नव्हते.

 

प. बंगालचा विचार केल्यास पंतप्रधान मोदी यांनी गेल्या सात दिवसांत तीन सभा घेतल्या. भाजप भलेही राज्यात २३ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवत असला तरी दीदी आपला आकडा वाढवण्यासाठी तेवढेच प्रयत्न करतील. त्यामुळे त्या राज्यात विकासकामे सुरू असल्याचे दाखवणे, केंद्राचा कथित अन्याय व राज्यात भाजप व देशात मोदींना सडेतोड उत्तर देण्याच्या प्रयत्नात त्या दिसतात. निवडणुकीपर्यंत केंद्र सरकारविरुद्ध वातावरण तापत राहावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. विकास योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यावरही त्यांचा भर आहे. 


ममता बॅनर्जी यांच्यावर दीदी : अ पॉलिटिकल बायोग्राफी' पुस्तकाच्या लेखिका मोनोबिना गुप्ता म्हणाल्या की, ममता गुंतागुंतीचे व निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे. सन २०१४ नंंतर त्यांचा आवेश काहीसा बदलला आहे. त्या राजकीयदृष्ट्या अधिक परिपक्व झाल्या असून आक्रमक शैली थोडी बदलली आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाचा आदर्श उमेदवार असतील हे सांगता येणार नाही, मात्र बळकट उमेदवार अवश्य असतील, असे मोनोबिना यांचे म्हणणे आहे. 

 

मोनोबिना म्हणाल्या, ममता राष्ट्रीय राजकारणात आक्रमक भूमिका बजावत आहेत. मात्र, निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केल्यास २०२१ च्या विधानसभा निवडणुका पाहता त्यांना राज्य सांभाळावे लागेल. पक्षात दुसऱ्या क्रमांकाची फळी नाही हे त्यामागचे कारण. रवींद्र भारती विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक व राजकीय विश्लेषक डॉ. विश्वनाथ चक्रवर्ती म्हणाले, आव्हाने व अडचणी आपल्या बाजूने कशा वळवायच्या हे ममतांपेक्षा अन्य कुणाला चांगले माहीत नाही. ममता बॅनर्जी यांनी ही बाब मान्य केली. शुक्रवारी कोलकात्याच्या इको पार्कमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, मला कोणी आव्हान दिल्यास मी आणखी बळकट होते. मी २३ वर्षे खासदार राहिले. मी या देशाला ओळखते. मी आंदोलनातून आले असल्यामुळे मला कोणी भीती दाखवू शकत नाही. सन २०१९ संदर्भात चक्रवर्ती म्हणाले, बहुतांश प्रादेशिक पक्षांचा काँग्रेससोबत ताळमेळ नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान होण्याची संधी आहे. ज्योती बसू व प्रणव मुखर्जी पंतप्रधान होऊ शकले नाहीत. राष्ट्रीय स्तरावर ३८-३८ जागांच्या मायावती-अखिलेश आघाडीनंतर ममतांशिवाय देशात कोणत्याही प्रादेशिक पक्षात ३५ किंवा त्यापेक्षा जास्त खासदार जिंकून आणण्याची क्षमता नाही. तृणमूल काँग्रेसशी संबंधित आणि स्थानिक राजकारणाच्या जाणकारानुसार, ममता बॅनर्जी यांनी मोठ्या कष्टाने विकास करणाऱ्या नेत्याची छबी तयार केली आहे. सिंगूर प्रकरणानंतर त्या राज्यांत औद्योगिक विकास साधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पाचव्या जागतिक परिषदेचे आयोजन त्यांनी केले. तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक अशोक झा म्हणाले, पश्चिम बंगालचे व्यक्तिमत्त्व संपूर्ण भारतापेक्षा भिन्न आहे. बंगाल जो आज विचार करतो तो विचार भारत उद्या करतो. २०१९ च्या मतांसाठी चिट फंड घोटाळ्यावर नाटक केले जात आहे. याच्या येथील लोकांवर परिणाम होणार नाही. तसे झाले असते तर २०१६ मध्ये त्या जिंकल्या नसत्या. 

 

दुसरीकडे काँग्रेसने प्रियंका गांधींना २०१९ च्या निवडणुकीसाठी हुकमी एक्क्याच्या रूपात आणले आहे. असे असले तरी पक्षाने त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशात दीर्घकालीन रणनीती आखली आहे. राहुल यांच्या टीममधील एका सदस्याने दिव्य मराठीला सांगितले की, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत प्रियंका मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असा संदेश २०१९ च्या निवडणुकीदरम्यान दिला जाईल. पक्षाने हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशातील राजकारणाचा अभ्यास करून रणनीती आखली आहे. हरियाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पकड आहे. तिथे भाजपचा कोणताही मोठा नेता नसताना सरकार स्थापन झाले. यूपीत भाजपचे कार्यकर्ते विस्कळीत झाले होते. मात्र, मोठ्या मताधिक्क्यामुळे योगी सरकार स्थापन झाले. दिल्लीतही आम आदमी पार्टीने शून्यातून सुरुवात करत सरकार आणले. काँग्रेस सूत्रांनुसार, प्रियंका यांना रायबरेलीव्यतिरिक्त त्यांना वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. मात्र, पक्ष त्यांना महाआघाडीचा उमेदवार म्हणून उभा करू इच्छित आहे. प्रियंका यांच्या तीन वॉर रूम आहेत. 

 

उत्तर प्रदेशात मायावतींच्या बाजूने दलित मतदारांत घट झालेली नाही. राजकारणाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. बसपच्या स्थापनेनंतर ९ लोकसभा व ८ विधानसभा निवडणुका त्यांनी हाताळल्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद चार वेळा सांभाळले आहे. आता मोदींना रोखण्यासाठी मायावती यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी सपसोबत योग्य समन्वय साधला आहे. बसपची जाटव मते व सपच्या यादव मतांसोबत उत्तर प्रदेशच्या अल्पसंख्याक समाजाच्या १९ टक्के मतांचे समीकरण तयार केले आहे. उत्तर प्रदेशात एससी, एसटीची लोकसंख्या २१.५% आहे. यात ५५ टक्के जाटव आहेत. हिंदू-मुस्लिम मागास जातींची लोकसंख्या ५४ टक्के आहे. यामध्ये यादव समाजाची लोकसंख्या २० टक्के आहे. हा आकडा अन्य जातींच्या समर्थकांना मिळून एकूण मतांच्या सुमारे ४० टक्के होते. मायावती दलित-मुस्लिम समीकरण करण्यासाठी अनेकदा निष्फळ प्रयत्न झाले. दलित मतदार मायावती यांच्या इशाऱ्यावर कोणालाही मतदान करण्यास तयार असतात. २००७ मध्ये मायावती यांनी दलितांसोबत ब्राह्मण मतदारांनाही जोडले होते. मात्र, त्या वेळी उर्वरित मागासवर्गीय दूर झाले. राजकीय विश्लेषक ज्ञानेंद्र शर्मा यांच्यानुसार ज्यांच्याकडून मते मिळवायची आहेत त्यांच्याकडून ती कशी मिळवायची हे मायावती यांना चांगले समजते. 

 

बातम्या आणखी आहेत...