आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार-डंपरचा समोरासमोर भीषण अपघात, मातपित्याचा मृत्यू तर दोन्ही मुले सुदैवाने बचावले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गुजरातच्या उच्छल-निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळील घटना

नवापूर - गुजरातमधील उच्छल-निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळ बुधवारी सकाळी ८ वाजता वाळूच्या डंपरने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची दोन मुले बालंबाल बचावली. योगेंद्रसिंग राजपूत व गायत्री योगेंद्र राजपूत अशी मृतांची नावे अाहेत. तर नीलमकुमार राजपूत व मयंककुमार राजपूत हे सुदैवाने बचावले. गुजरात राज्यातील वापी येथे एका खासगी कंपनीचे सहायक अभियंता योगेंद्र राजपूत हे परिवारासह बुधवारी सकाळी ६.४५ वाजता कारने वापीहून शहादा तालुक्यातील अनरद येथे येत हाेते. सकाळी ८ वाजता नवापूरजवळील उच्छल-निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळ वाळूने भरलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने कार डंपरखाली अर्धी घुसून गेल्याने ती दूरपर्यंत घसरत गेली. अपघातात योगेंद्रसिग राजपूत व त्यांच्या पत्नी गायत्री योगेंद्र राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या मागे बसलेली त्यांची मुले नीलमकुमार राजपूत (वय ८) व मयंककुमार राजपूत (वय १२) हे सुदैवाने बचावले आहेत. मयंककुमार गंभीर जखमी झाला असून, त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी उच्छल सरकारी रुग्णालयात मोठी गर्दी केली. घटनास्थळावरून डंपरचालक पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. त्याच्यावर उच्छल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघात भीषण असल्याने मृतांना व बालकांना कारमधून बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. कारचा दरवाजा उघडत नसल्याने काच फोडून मुलांना बाहेर काढले.