आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या गावात राहत नाही एकही पुरुष, तरीही प्रेग्नेंट होतात महिला, यामागचे कारण आहे खास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात अनेक विचित्र गोष्टी आहेत. यामधील अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. पण हळुहळू याविषयी माहिती मिळते. आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाविषयी सांगत आहोत, जिथे एकही पुरुष राहत नाही. तरीही या गावातील महिला प्रग्नेंट होतात. येथे गेल्या 27 वर्षांपासून एकही पुरुष नाही. 

 

अफ्रीकेच्या घनदाट जंगलांमध्ये हे एक गाव आहे. जे जगभरातील अनेक गावांपासून वेगळे आहे. कारण या गावाच्या आजुबाजूला कोणीही पुरुष येऊ शकत नाही. या गावातील लोकांनी असे का केले यामागेही एक खास कारण आहे. ज्या महिलांसोबत ब्रिटिश जवानांनी बलात्कार केला होता. त्या महिलांना 1990 मध्ये या गावात राहण्यासाठी निवडले. 

- यामुळे या गावाता बलात्कार, बालविवाह, घरगुती हिंसा आणि खतनासारख्या हिंसेचा सामना केलेल्या महिलांनी या गावात पुरुषांनी येण्यास बंदी घातली. हे अफ्रिकेतील सिंगल-सेक्स कम्युनिटी असणारे एकच गाव आहे. 
- हे एक लहानसे गाव आहे. पण येथे जवळपास 250 महिला आपल्या मुलांसोबत राहतात. या गावात महिलांनी प्रायमरी स्कूल, कल्चरल सेंटर आणि सामबुरु नॅशनल पार्क पाहण्यासाठी येणा-या टूरिस्ट्ससाठी कँपेन साइटही चालवली आहे. यानंतर अनेक देशातील लोक हे गाव पाहण्यासाठी येतात. या महिलांनी याची फीसही ठेवली आहे. 
- पर्यटकांकडून होणा-या कमाईमुळे या महिलांचा उदनिर्वाह चालतो. या गावात पुरुष येण्यास बंदी असूनही येथील महिला प्रेग्नेंट राहतात. यामागे एक रहस्य आहे. या महिला शारीरिक संबंध बनवण्यासाठी रात्री गुपचूप बाहेर जातात. यानंतर त्या आपल्या आवडत्या पुरुषासोबत संबंध ठेवतात आणि प्रेग्नेंट होतात.