Home | National | Gujarat | man arrested for thefts reveals doing it fulfil girlfriends desires from rajasthan

GF चे शौक पूर्ण करता-करता तो बनला चोर; गुजरातहून राजस्थानला गेला, पकडले तेव्हा सांगितली आपबिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 06:11 PM IST

गुजरातहून आलेल्या संदीपने गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या.

 • man arrested for thefts reveals doing it fulfil girlfriends desires from rajasthan

  सीकर - राजस्थानच्या सिंघाना येथे गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेल्या चोरीच्या घटनांप्रकरणी एका युवकाला मंगळवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संदीप कुमावत उर्फ ऊंटडा असून तो 24 वर्षांचा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो राजस्थानात होता. गुजरातहून आलेल्या संदीपने गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. पोलिसांनी पकडले तेव्हा रडत-रडत त्याने या घटनांसाठी आपल्या प्रेयसीला जबाबदार धरले. तिच्याच मागण्या आणि महागडे शौक पूर्ण करण्यासाठी आपण चोर बनलो अशी कबुली त्याने दिली.


  गुजरातहून राजस्थानात येऊन चोरी
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपची गुजरातमध्ये एक प्रेयसी आहे. त्यांनी आपल्या सुत्रांकडून त्या प्रेयसीची ओळख पटवली. चार महिन्यांपूर्वी तो गुजरातमध्येच राहत होता. परंतु, पैसे संपल्यानंतर त्याने राजस्थानच्या सिंघाना येथे येऊन चोरी करण्यास सुरुवात केली होती. राजस्थानात चोऱ्या करून, त्या चोरीचा माल विकून आपल्या प्रेयसीकडे जाण्याच्या तयारीत होता. त्याच दरम्यान पोलिसांनी संदीपला अटक केली.


  यापूर्वीही झाली होती 22 महिन्यांची कैद
  आरोपीने यापूर्वीही चोऱ्या केल्या असून त्याला या प्रकरणात 22 महिन्यांची कैद झाली होती. 4 महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून सुटला आणि पुन्हा चोऱ्या सुरू केल्या. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथक नेमले होते. त्याच पथकांनी संदीपची पार्श्वभूमी जाणून त्याचा पत्ता लावला. काही दिवसांपूर्वीच आरोपी रेल्वे लाइन परिसरात राहत असल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी रात्री उशीर धाड टाकली. त्यावेळी संदीप घरात झोपलेला होता. प्राथमिक चौकशीत त्याने पसार होण्याच्या तयारीत असल्याचे मान्य केले. आता परिसरात एकूण किती चोऱ्या झाल्या आणि त्यात संदीपचा किती हात होता याचा तपास पोलिस करत आहेत. यासोबतच त्याच्याकडून चोरलेला माल परत मिळवण्यासाठी त्याची कसून चौकशी केली जात आहे.

Trending