आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेबरोबर नाश्ता केल्याने तरुणाला अटक, व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूझर्सनेही घातल्या शिव्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाद - सौदी अरबमध्ये एका व्यक्तीला त्याने ऑफिसमधील महिलेबरोबर नाश्ता केल्याच्या आरोपात अटक झाली. नाश्ता करतानाची त्याची 30 सेकंदाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करम्यात आली, ती व्हारल झाली. त्यानंतर सोशल मीडिया यूझर्सनेही त्यांना शिव्या घातल्या. तर काही लोकांनी त्याच्या अटकेला विरोधही केला. 

 

काय आहे व्हिडिओत.. 
इजिप्तचा राहणारा तरुण सौदीच्या हॉटेलमध्ये वर्कर आहे. त्याने दुसऱ्या एका महिला वर्करच्याबरोबर नाश्ता करतानाचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये बुर्का परिधान केलेली महिला तरुणाच्या शेजारी बसलेली असून ती तरुणाला खाऊ घालताना दिसतेय. दोघे मजाक करत हसताना दिसताहेत. ट्वीटरवर हा व्हिडिओ सव्वालाखांपेक्षा जास्तवेळा शेअर झाला. व्हिडिओ व्हायरल होता. तरुण आणि महिलेला यूझर्स शिव्या देऊ लागले. लोकल अथॉरिटीनेही याविरोधात कारवाईची तयारी केली. सौदीच्या कायद्यानुसार तरुणाला आरोपी ठरवत अटक केली आहे. सौदीमध्ये महिला आणि पुरुषांनी ऑफिसमध्ये किंवा पब्लिक प्लेसेसवर एकत्र बसण्यास मनाई आहे. एकटी महिला सोबत पुरुष नसताना अशा पार्टीत किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही. 

 
सोशल मीडिया यूझर्सने शिव्या घातल्या  
या व्हिडिओमुळे सोशल मीडिया यूझर्सही भडकलेले आहेत. महिला आणि तरुण दोघांनाही त्यावरून लोक शिव्या देत आहेत. या दोघांनी वर्कप्लेसवर अशाप्रकारे हसण्याची आणि एकत्र जेवण्याची हिम्मत कशी केली असे लोक म्हणत आहेत. एका महिलेने लिहिले या महिलेलाही शिक्षा व्हायला हवी. तिला तिच्या मर्यादा माहिती नाहीत का? काही यूझर्सने यावरून नाराजीही व्यक्त केली. 2018 सुरू आहे आणि हे नेमके काय घडत आहे हे कळत नाही. हा शतकातील सर्वात मोठा जोक आहे असे लोक म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...