आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्‍या स्‍मार्ट प्‍लॅनमध्‍ये फसला नितिन गडकरींचा तोतया सचिव, सफाई कंपनीसाठी महापालिकेकडून मागितले तब्‍बल 12 कोटी रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा स्वीय सचिव असल्याची थाप त्याने मारली. राजस्थानातील जयपूरच्या महापालिकेत साफसफाईची कामे करणाऱ्या कंपनीचे १२ कोटींचे बिल मिळवून देण्यासाठी तो महापौरांना भेटला. परंतु महापौरांच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला. या अारोपीचे टोपणनाव अजय राणा अाहे. पण प्रत्यक्षात तो अशोक पंुडीर निघाला. तो उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवासी आहे. सध्या दिल्लीतील सुल्तानपुरी येथील अमन विहारमध्ये राहतो. 


अारोपी मंगळवारी महापौर अशोक लाहोटी यांना भेटला. तेव्हा त्याच्यासोबत साफसफाईचे कंत्राट घेतलेल्या प्रहरी नावाच्या कंपनीचे मालक कमलजितसिंग व अंजुम वाहिद होते. कंपनी मालकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या दोघांनाही आरोपीने बिलाची सेटलमेंट करून देण्याचे आमिष दाखवले होते. महापौर लाहोटी यांना अरुण पंुडीरचा संशय आला. त्यांनी आपल्या मोबाइलने त्याचे छायाचित्र काढले व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयास पाठवून दिले. तेथून तरुणाबाबत माहिती घेतली. मंत्र्यांचे सहसचिव वैभव व शैलेश यांनी छायाचित्र पाहून आमच्या कार्यालयात अशा प्रकारची व्यक्ती कामास नाही, असे कळवले. महापौर लाहोटी यांनी त्यास  सुरक्षा प्रमुखांच्या ताब्यात दिले. 


दिल्लीहून केला होता फोन
आरोपी तरुण अशोक पंुडीर याने महापालिकेत महापौरांना भेटण्यास येण्यापूर्वी सोमवारी दिल्लीहून फोन केला होता. त्याने स्वत:ला नितीन गडकरी यांचा खासगी सचिव असल्याचे सांगितले. प्रहरी कंपनीचे बिल देण्याची शिफारसही केली. महापौरांनी त्यास मंगळवारी कार्यालयात येऊन चर्चा करण्यास सांगितले. 


कर्मचाऱ्यांचा पीएफ रोखल्याने केली कारवाई
प्रहरी कंपनीने २०११ ते २०१४ पर्यंत महापालिकेच्या वॉर्डाची स्वच्छता व कंत्राटी कामगार पुरवण्याच्या कंत्राटासह अनेक कामे केली. कंपनीने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नव्हता. त्यामुळे तत्कालीन महापौर ज्योती खंडेलवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कंपनीविरोधात सीबीआयमध्ये तक्रार केली होती. महापालिकेने सुमारे १२ कोटींचे बिल रोखले.

 

बातम्या आणखी आहेत...