आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकिदाराने शालेय विद्यार्थ्यांवर हातोड्याने केले हल्ले, 20 मुले जखमी; नोकरीवरून काढल्याचा होता राग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनची राजधानी बीजिंगजवळील एका प्राथमिक शाळेतील चौकीदाराने  विद्यार्थ्यांवर हातोड्यासह इतर अवजारांनी हल्ला केल्याची घटना घडली. घटनेत 20 मुले जखमी झाले. त्याला नोकरीवरून काढून टाकल्यामुळे त्याने हे हिंसक कृत्य केल्याचे मानले जाते. मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर चौकीदाराने एकानंतर एका मुलावर हातोड्याने मारहाण केली. सुरीनेही हल्ला केला.


हल्ला केला तेव्हा मुले आपल्या वर्गात अभ्यास करत होती. मुलांवर उपचार सुरू असून त्यापैकी तीन जणांचा प्रकृती गंभीर आहे. ही घटना बीजिंगच्या शिचेंग जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत घडली. चौकीदाराला नोकरीवरून काढल्याने त्याने संताप व्यक्त करून हा टोकाचा निर्णय घेतला. या हल्ल्यानंतर संतप्त पालकांनी शाळेला घेराव घातला व व्यवस्थापनाला जाब विचारला. अलीकडे चीनमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. जानेवारी 2017 मध्ये पिंगशियांग शाळेत एका हल्लेखोराने 12 मुलांवर हल्ला केला होता. त्यानंतर दोषीला शुक्रवारी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...