आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन एका जणाची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 दिग्रस-तालुक्यातील लोणी येथील एका ४० वर्षीय इसमाने शनिवार, दि. एक डिसेंबर रोजी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावली. े या प्रकरणाची तक्रार सागर इंगोले याने दिग्रस पोलिस ठाण्यात दिली. मात्र, दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप करित मृतकाच्या नातेवाईकांनी केल्याने चांगलीच खळबळ उडाली. 
दिगांबर नारायण इंगोले हे सकाळी शेतातील कामे करण्याचे सांगून घरून निघाले होते. मात्र, ८ वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याने दिगांबर यांचा मुलगा सागर हा शेतात गेला होता. दरम्यान, वडिलांनी झाडाला गळफास लावल्याचे सागर याच्या निदर्शनास आले. तद्नंतर दिग्रस पोलिसांना याची माहिती दिली. मृतकाच्या नातेवाईकांनी दिगांबर याने दबावाखाली आत्महत्या केली असून, आरोपींना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी केली. यावेळी दिवसभर पोलिस ठाण्यात एकच जमाव केला. दरम्यान, सायंकाळपर्यंत मृतकाचे शवविच्छेदन होवू शकले नाही. त्यानंतर एसडीपीओ डॉ. नीलेश पांडे, तहसीलदार किशोर बागडे, ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी नातेवाईकांची समजूत काढली. 

बातम्या आणखी आहेत...