आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीचा धक्का लागल्याने बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भरधाव दुचाकीस्वाराने धक्का दिल्याच्या कारणावरुन दोघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना नुकतीच कोहिनूर कॉलनीत घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख तालीब शेख रियाज (२२, रा. मोगलपुरा, कोहिनूर कॉलनी) हा घरासमोरील रस्त्यावर उभा असताना समोरुन आलेल्या समीर खान व जमील खान या दुचाकीस्वारांनी त्याला धक्का दिला. त्यावरुन गाडी व्यवस्थित चालवा, असे म्हणताच दोघांनी तालीबला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेख रिझवान आणि शेख अरबाज यांना देखील दोघांनी लोखंडी पाइपने मारहाण केली. बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...