आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणूसकीला काळीमा; 750 रुपये चोरले म्हणून केली अशी शिक्षा, विवस्त्र पळाला तरूण, पोलिसांनी झाकले अंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अम्बाला- प्रभु प्रेम पुरम परिसरात राहणाऱ्या एका तरूणासोबत लाजिरवानी घटना घडली. नशेत त्याने एका रिक्षाचा गल्ला फोडून त्यातील 750 रुपये चोरी केले. हे पाहून ऑटोचालकाने आरडाओरड केली. दरम्यान, आसपास असलेल्या लोकांनी त्याला पडकडून धुलाई केली आणि त्याचे कपडे फाडून त्याला विवस्त्र केले. तरूणाने कशीबशी लोकांच्या तावडीतून सुटका करून घेऊन स्वत:चा जिव वाचवला.


कपड्यांविना पळाला तरूण...
मारहाणीची माहिती ऐकूण घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नग्न अवस्थेत रस्त्यावरून पळणाऱ्या तरूणाला टॉवेल देऊन त्याचे अंग झाकले. संबंधीत तरूण हा नशा करतो आणि सीटी सिव्हिल हॉस्पिटलमधील नशा मुक्ती केद्रात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या नातेवाईकांनीच त्याला केंद्रात दाखल केले असल्याची माहिती आहे. 

 
काहीच कळाले नाही, जिव वाचवत रस्त्यावरून पळाला...
मारहाणीत शरिरावरील सर्व कपडे फाटल्यानंतर तरूणाला काहीच कळेनासे झाले. जिव वाचवत तो लोकांच्या तावडीतून सुटून रस्त्यावरून धावत हॉस्पिटलच्या दिशेने पळाला परंतु, पाहणाऱ्यांनी कोणीच त्याचे अंग झाकण्याचा प्रयत्न केला नाही. जवळपास दहा मिनिटे तो रस्त्यावरून इकडे-तिकडे पळत होता. पोलिसांनी पोहचून त्याला सुरक्षा दिली आणि त्याचे अंग झाकून त्याला पोलिस चौकीत नेले. 
 

ऑटो चालक म्हणाला- मी नाही लोकांनी केली मारहाण....
ऑटोचालक अशोकने सांगितले की, मी ऑटो उभी करून कामासाठी एजंसीमध्ये गेलो होते. परत आलो तेंव्हा पाहिले की ऑटोचा गल्ला तुटलेला होता आणि त्यातून 750 रूपये गायब होते. तो युवक जोरत पळत होता, त्यामुळे मी आरडाओरड केली. ते ऐकून अनेक तरूण तेथे जमा झाले. त्यांनी मी ओळखतही नव्हतो. परंतु, त्यांनी तरूणाकडून पेसै काढण्यासाठी त्याला मारहाण सुरू केली.या दरम्यान त्याचे सर्व कपडे फाटले आणि तो पळू लागला.

 

बातम्या आणखी आहेत...