आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्डर: शेवटच्या श्वासापर्यंत तरुणाला केली मारहाण, मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटलबाहेर मृतदेह फेकून निघून गेले मारेकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर (हरियाणा) - शनिवार बलदेव सिंह नावाच्या तरुणाची काही दारु माफियांनी हत्या केली. त्याच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. छाती आणि तोंडावर टोकदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा होत्या. हाताच्या बोटांची त्वचा फाटली होती. माफियांनी अतिशय निर्घृणपणे त्याची हत्या केली.


रात्रभर मारहाण सहन केल्यानंतर घरी आला होता... 
मृत बलदेव सिंहचे कुणीही नातेवाईक नाहीत. त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याला मुलेही नव्हती. तो विशाल बक्शी नावाच्या व्यक्तीच्या घरी भाड्याने राहात होता. रात्रभर मारहाण झाल्यानंतरही त्याने कुणाला यासंदर्भात काहीच सांगितले नाही आणि तो आपल्या घरी आला. मारहाणीच्या जखमांमुळे तो तडफडत होता. आरोपी पुन्हा मारहाण करण्यासाठी त्याच्या घरी आले आणि पुन्हा त्याला मारहाण करायला सुरुवात केली.

 

मारेकरी आले होते पूर्ण तयारी करुन, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळाले पुरावे

बलदेव वाळू सप्लायर असलेल्या विशाल बक्शींकडे दोन महिन्यांपासून नोकरी करत होता. बलदेवला घरातून उचलून घेऊन जाताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. पंकज आणि मन्नी नावाचे आरोपी त्यांच्या काही साथीदारांसोबत बलदेवला मारण्यासाठी पुर्ण तयारीनिशी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 

 

ज्यांनी केली हत्या, ते होते मित्र... 
पोलिसांनी कृष्णा कॉलोनीत राहणा-या पंकज आणि ईशू उर्फ मन्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत बलदेव या दोघांचा मित्र असल्याचे समोर आले आहे. अनेकदा हे दोघे बलदेवला दारु पाजायचे. पोलिसांना बलदेवच्या घरातून दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. 

 

श्वास जाईपर्यंत केली मारहाण... 
बलदेवचा मित्र मेजर सिंहने सांगितले, घटनेच्या वेळी मी बलदेवसोबत त्याच्या घरी होतो. रात्री दहा वाजताच्या सुमारास पंकज आणि मन्नी तेथे आले. त्यांनी बलदेवच्या घरावर दगडफेक करायला सुरुवात केली. बलदेव घराबाहेर आल्यानंतर ते दोघे त्याला बाइकवर घेऊन तिथून निघून गेले. बलदेवने आमचा गळा कापला आहे, त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल, असे पंकज आणि मन्नी बडबडत होते. ते बलदेवला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि तिथे बेदम मारहाण केली. त्यानंतर बलदेव त्याच्या घरी परत आला. आरोपी पुन्हा त्याच्या घरी आले आणि त्याला मरेपर्यंत मारहाण केली.

 

बलदेवला पंकज आणि मन्नीच्या खासगी गोष्टी होत्या ठाऊक, म्हणून होता संशय... 
बलदेवला मन्नी आणि पंकज यांच्या दारुच्या व्यवसायातील अनेक खासगी गोष्टी माहिती होत्या. तीन दिवसांपूर्वी जेव्हा त्यांच्या दारुच्या अड्यावर पोलिसांची धाड पडली होती, तेव्हा पंकज आणि मन्नीचा बलदेववर संशय आला. बलदेवनेच पोलिसांना त्यांच्याविषयी सांगितले असा त्यांचा संशय बळावला होता. दारु पित असताना बलदेवचा पंकज आणि मन्नीसोबत वाद झाला होता. अवैध दारु पकडल्या गेल्याने पंकज आणि मन्नीला पोलिसांना काही पैसे द्यावे लागले होते. ते पैसे हे दोघे बलदेवकडे परत मागत होते. 

बातम्या आणखी आहेत...