आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीची हत्या करून बनला साधू, 5 वर्षांनी हनुमान दास महाराजला भागवत कथा वाचताना झाली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलाई (छत्तीसगड) - 5 वर्षांपूर्वी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करणाऱ्या तरुणाला संत बनून कथा वाचन करताना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केली तेव्हा तो संत हनुमान दास महाराज बनून मध्यप्रदेशच्या छतरपुरात मोठ्या संख्येने भक्तांमध्ये बसून कथा वाचन करता होता. अटकेनंतर गुरुवारी भिलाईला त्याला नेण्यात आले.

 

आरोपी देशभरात संत हनुमान दास बनून करू लागला कथा वाचन
पोलिस सूत्रांनुसार, रामनगर सुपेलाचा रहिवासी आरोपी सुशील दुबे 18 ऑक्टोबर 2013 रोजी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या रिता साहूची हत्या करून फरार झाला होता. आपली ओळख लपवण्यासाठी इलाहाबादच्या संगम तटावर तो साधू बनला. देशभरात संत हनुमान दास बनून कथा वाचनही करू लागला. 2 वर्षांपूर्वी सुशील कुटुंबाच्या संपर्कात आला. यादरम्यान पोलिसांना तो साधू बनल्याची माहिती मिळाली. कुटुंबाचे कॉल डिटेल आणि त्याच्या स्केचच्या आधारे शोध घेतल्यावर पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले.


बैकुंठपूर-कोरियाची रहिवासी होती तरुणी...
अॅडिशनल एस.पी. सिटी विजय पांडेय म्हणाले की, गायत्री मंदिर वॉर्ड 13 मध्ये रामनगर पोलिसांना एका बंद रूममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह आठ दिवसांपासून तेथे पडून होता. शोध घेतल्यावर तो  रूपनगर बैकुंठपूर कोरियाची रहिवासी रीता साहूचा असल्याचे आढळले. तोपर्यंत आरोपी फरार झालेला होता.


लिफ्ट देऊन आला होता तरुणीच्या संपर्कात, पत्नीला सोडून राहू लागला सोबत...
या प्रकरणाच्या खुलाशात महत्त्वाची भूमिका असणारे सीएसपी श्याम सुंदर शर्मा म्हणाले की, भिलाईमध्ये राहताना आरोपी टॅक्सी चालवण्याचे काम करत होता. एकदा त्याने कुम्हारीमध्ये किरायाच्या खोलीत राहणाऱ्या रीता साहूला लिफ्ट दिली होती. यानंतर दोघांच्या भेटीगाठी एवढ्या वाढल्या की आरोपी तिला घरी जाऊन भेटू लागला. यानंतर तरुणी त्याच्यासेाबत राहण्याचा हट्ट करू लागली तेव्हा त्याने तिच्यासाठी रामनगरमध्ये एक घर भाड्याने घेतले. यादरम्यान, दोघांमध्ये प्रेमसंबंध एवढे मधुर होते की, तो पत्नीला सोडून तिच्यासोबतच राहू लागला.


अवैध संबंध उघड होताच झाले भांडण
आरोपी सुशीलने पोलिसांना सांगितले की, रीतासोबत अवैध संबंधही होते. यादरम्यान एका दिवशी दारूच्या नशेत तिच्याशी वाद झाला. त्यादरम्यान रिताही नशेत होती. वाद वाढल्यावर त्याने रीता साहूचे डोके अनेक वेळा भिंतीवर आदळले. यामुळे ती बेशुद्ध होऊन खाली पडली. यावर रूमला बाहेरून कुलूप लावून सुशील फरार झाला.


साधूंची सेवा करता-करता बनला बाबा, तेथेही तरुणीला अडकवले
आरोपीने सांगितले की, भिलाईवरून पळून जाण्याआधी तो आपल्या नातेवाइकाच्या घरी कौशांबीला गेला. परंतु त्यांना जास्त दिवस थांबू दिले नाही, तेव्हा त्याने काही दिवस ट्रकवर क्लीनरचे काम केले. यानंतर इलाहाबाद (प्रयाग) मध्ये संगमावर साधूंची सेवा करू लागला. तेथे काम करता- करता त्याला हनुमान दास महाराज हे नाव मिळाले. कथा वाचक आणि विविध संतांसोबत देशभरात फिरून प्रवचने देऊ लागला. सीएसपी श्याम सुंदर शर्मा म्हणाले की, तपासात पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी प्रयागमध्येही एका तरुणीच्या संपर्कात होता.


2 वर्षांपासून कुंटुंबाच्या संपर्कात
भिलाई नगरचे सीएसपी म्हणाले की, पेडिंग केसेसची पाहणी केल्यावर हे प्रकरण समोर आले. नव्याने तपास सुरू झाला. आधी भिलाईमध्ये राहणाऱ्या पत्नीचे कॉल ट्रेस करण्यात आले. पत्नी शर्मिला एका हनुमान दास महाराजाशी सातत्याने बोलत असल्याची माहिती मिळाली. यामुळे दोन वेळा टीम इलाहाबादला पाठवली. जेव्हा आरोपीची ओळख पटली तेव्हा त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येऊ लागली. सुशीलला मध्यप्रदेशच्या छतरपुरमध्ये कथा वाचताना अटक करण्यात आली.


स्केच तयार करून शोध घेताच मिळाले यश...
आरोपीचा कोणताही सुगावा लागत नव्हता. अनेक वर्षांच्या तपासानंतर तो साधू बनल्याचीच माहिती हाती येत होती. स्केच तयार करून शोध घेतल्यावर यश मिळाले. 
-डॉ. संजीव शुक्ला, एसएसपी, दुर्ग. 

 

बातम्या आणखी आहेत...