आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लभ आजारामुळे प्रायव्हेट पार्टशिवाय जन्मला हा व्यक्ती, 45 वर्ष असेच काढले; डॉक्टरांनी केली कमाल आणि लावले नवीन अंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - इंग्लंडमध्ये डॉक्टरांनी एक यशस्वी सर्जरी करून एका व्यक्तीला नवीन प्रायव्हेट पार्ट बसवला आहे. हा व्यक्ती प्राव्हेट पर्वतशिवाय जन्माला आला होता. हा आजार लाखो-कोटी लोकांमध्ये एखाद्याच व्यक्तीला होतो. लंडनच्या एका फेमस हॉस्पिटलमध्ये या व्यक्तीची लाइफ चेंजिग सर्जरी झाली. विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी त्याचे हे नवीन अंग त्याच्या शरीराची स्किन वापरून बनवले. जवळपास 10 तास चाललेल्या या सर्जरीसाठी रुग्णाने 50 हजार पाउंड (47 लाख रुपये) खर्च केले.


फेलोप्लास्टी करत लावले अंग 
- ही स्टोरी ग्रेटर मँचेस्टर शहरात राहणाऱ्या 45 वर्षीय अँड्र्यू वॉर्डलची आहे.
- अँड्र्यू मागील 45 वर्षांपासून प्रायव्हेट पार्टशिवाय राहत आहे. अँड्र्यूचा जन्म 'ब्लॅडर एक्स्ट्रॉफी' या एक दुर्लभ आजारात झाला होता. हा आजार 'एक्टोपिया वसाइक' नावानेही ओळखला जातो. या आजारपणात व्यक्तीच्या शरीरातील प्रायव्हेट पार्ट डेव्हलप होत नाही.
- अँड्र्यूच्या शरीरात अंडकोष होते परंतु प्रायव्हेट पार्ट नव्हता.
- ब्लॅडर एक्स्ट्रॉफी नामक हा आजार अत्यंत दुर्लभ असून 40 हजार मुलांमध्ये एखाद्याला होतो. परंतु अँड्र्यूच्या केसमध्ये ज्या गोष्टी होत्या त्यानुसार जवळपास 2 कोटी लोकांमध्ये एखाद्यालाच हा आजार होतो.


जूनमध्ये सुरु झाली सर्जरीची प्रोसेस 
- अँड्र्यूला प्रायव्हेट पार्ट लावण्याची ही प्रोसेस जून महिन्यात झाली होती. डॉक्टरांनी त्याच्या हाताची त्वचा आणि पायाची नस वापरत प्रायव्हेट पार्ट बनवणे सुरु केले होते.
- यासाठी डॉक्टरांनी त्याची फेलोप्लास्टी केली. ही एक प्रकारची प्लास्टिक सर्जरी आहे. त्यानंतर त्याला नवीन अंग लावण्यात आले. ही सर्जरी 10 तास चालली.
- सर्जरीनंतर अंग व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे पाहण्यासाठी 10 दिवस अँड्र्यूला हॉस्पिटलमध्ये थांबावे लागले. सेक्स करण्यासाठी त्याला 6 आठवडे थांबण्यास सांगितले होते.


बटनने काम करतो प्रायव्हेट पार्ट
- प्रायव्हेट पार्ट लावल्यानंतर अँड्र्यूने आपली गर्लफ्रेंड फेड्रा फेबियनसोबत पहिल्यांदा फिजिकल झाला. हा अनुभव अत्यंत सुंदर असल्याचे त्याने सांगितले.
- फिजिकल रिलेशनपूर्वी अँड्र्यूला इरेक्शनसाठी एक बटन दाबावे लागते. हे बटन त्याच्या मांडीवर लावण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या अंडकोषातून एक व्हॉल्व्हच्या माध्यमातून सलाईन फ्लूड प्रायव्हेट पार्टमध्ये जाते आणि जवळपास 20 मिनिटांसाठी इरेक्शन होते.
- अँड्र्यूच्या गर्लफ्रेंडनेसुद्धा हा अनुभव सुख देणारा असल्याचे सांगितले. तिच्यानुसार सर्वकाही एकदम नॉर्मल आहे, फक्त हे थोड्या वेगळ्याप्रकारे वर्क करते. अँड्र्यूला व्हायग्रा खाण्याची आणि वृद्ध होण्याचा त्रास होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...