Home | Khabrein Jara Hat Ke | Man buys 23 Burger King apple pies to spite screaming child

रेस्तराॅ मधील लांब रांगेत एक मुलगा घालत होता धिंगाणा, जेव्हा व्यक्तीने त्याला शांत बसविण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलाच्या आईने दिले उलट उत्तर; नंतर त्या व्यक्तीने केले असे काही की, ती महिला झाली आश्चर्यचकित

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 10, 2018, 01:10 PM IST

थोड्या वेळाने मुलाच्या आईला कळाले की, तिने किती मोठी चूक केली आहे.

 • Man buys 23 Burger King apple pies to spite screaming child

  वाशिंग्टन - अमेरिकामध्ये एक व्यक्ती फेमस बर्गर रिटेल चेन दुकानावर बर्गर खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा तेथे त्याच्या पाठीमागे एक मुलगा खूप धिंगाणा घालत होता. त्या व्यक्तीने मुलाच्या आईला त्याला शांत बसयाला सांगण्यास सांगितले तेव्हा त्या मुलाच्या आईने उलट त्या व्यक्तीलाच खरी खोटी सुनवली. त्यानंतर त्या व्यक्तीने असे काही केले की, मुलगा आणि त्याची आई पाहतच बसले. मुलगा ज्यासाठी जिद्द करत होता ती सगळी अॅपल पाई (स्वीट डिश) त्या व्यक्तीने खरेदी केली होती. त्याने हे चुकीचे केले की चांगले हे त्याला समजले नाही पण त्या महिलेला आणि मुलाला धडा शिकवण्यासाठी त्याने ती स्वीट डिश सगळीत खरेदी केली.

  मुलगा ठरला होता डोकेदुखी

  - ही गोष्ट एका व्यक्तीने सोशल मिडिया साइट रेडिट वर शेअर केली होती. त्याने सांगितले की, मी बर्गर खाण्यासाठी एका फेमस रेस्त्राँमध्ये गेलो होतो. तो दिवस माझ्यासाठी चांगला नव्हता. मी सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते आणि माझे डोकेही दुखत होते. अशातच तेथील ग्राहकांची रांग पाहून माझा मूड आणखीनच खराब झाला.

  - लांब रांग असूनदेखील त्याने त्याचा निर्णय नाही बदलला आणि तो रांगेत पाठीमागे जाऊन उभा राहिला. त्यानंतर एक महिला त्याच्या मुलाला घेऊन तेथे आली आणि त्याच्या मागे उभी राहिली. व्यक्तीच्या तो मुलगा त्याच्या आईकडे अॅपल पाईसाठी हट्ट करत होता.

  - थोड्यावेळाने त्या मुलाचे स्वतःवरील नियंत्रण सुटले. तो सारखा ओरडत होता. धिंगाणा घालत होता आणि रडत रडत आईला मारत होता. पण त्याच्या आईवर काहीच परिणाम झाला नाही. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून मोबाइलमध्ये व्यस्त होती.

  - व्यक्तीने लिहिले आहे की, त्या मुलाच्या ओरडण्याने माझी डोकेदुखी आणखीनच वाढली होती. पण मी बर्गर घेण्याची माझी जिद्द सोडली नाही.

  व्यक्तीने विनंती करेली तर त्याच्यावरच उलटली आई
  - मुलाच्या गोंधळाने त्रासलेल्या व्यक्तीने त्याच्या आईकडे महिलेला अगदी नम्रपणे मुलाला शांत करायचे सांगितले तेव्हा महिलेने त्यालाच खरी-खोटी ऐकवली. त्या महिलेनी त्याला त्याच्या कामाकडे लक्ष देण्याचे सांगितले.
  - तिचे बोलणे ऐकताच व्यक्तीने समोर पाहिले. त्यानंतर त्या महिलेने पाईसाठी हट्ट करणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी ओरडली. पण तेव्हा मुलाने रडण्यास सुरूवात केली होती. मग तिने त्याला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

  - 5 मिनीटानंतर तो व्यक्ती काउंटरजवळ पोहोचला तेव्हा त्याने त्या महिलेला धडा शिकविण्यासाठी दुकानातील सर्व 23 पाई खरेदी केल्या.

  - व्यक्तीने सांगितले की, रांगेमध्ये उभा असताना माझ्या मनात विचार आला की, ज्याप्रकारे माझ्या मागे उभ्या असणाऱ्या लोकांनी माझा मूड खराब केला तर मी पण त्यांचा दिवस का नको खराब करू. त्यामुळे मी सगळ्या पाईज खरेदी केल्या.
  - आपली ऑर्डर घेऊन निघल्यावर त्याच्या मागे उभी असणाऱ्या महिलेचा आवाज त्याच्या कानावर पडला. ती काउंटर वर जोर-जोराने ओरडत होती. ती म्हणत होती याचा काय अर्थ की तुमच्याकडे एकही पाई नाही. कोणी खरेदी सगळ्या पाई? त्यानंतर कॅशिअकर महिलेने त्या व्यक्तीने सगळ्या पाई विकत घेतल्याचे सांगितले.

  - त्या व्यक्तीचा चेहरा पाहतात ती महिलेला धक्का बसतो. तेव्हा तो व्यक्ती तिला चिडवण्यासाठी एक पाई काढून खाण्यास सुरूवात करतो आणि महिला फक्त त्याच्याकडे पाहत राहते.

Trending