आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युशी झुंज..रेल्वे रुळावरुन जात होता तरुण, तितक्यात अचानक आली भरधाव एक्स्प्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढोलपूर (राजस्थान)- 'दुर्घटना से देर भली!' असे बऱ्याचदा म्हटले जाते. तरीही बहुतांश लोक घाईगडबडीत आपले आयुष्य धोक्यात घालतात. या तरुणासोबतही असेच काहीसे झाले.

 

ही घटना आहे ढोलपूर रेल्वे स्टेशनजवळची. एक तरुण एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पादचारी पुलावरून जाण्याऐवजी रेल्वे रुळ ओलांडायचा प्रयत्न करत होता. त्याचवेळ‍ी संपर्क क्रांती एक्स्प्रेस प्रचंड वेगात आली. या स्थितीत तरुणाला रुळावरून बाहेर निघणे अवघड झाले. तो रुळाच्या मध्यभागी खडीवर लोटला. साधारणपणे 2 मिनिटांपर्यंत एक्स्प्रेस गाडीचे डबे त्याच्यावरुन जात होते.हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले लोक अक्षरश: सुन्न झाले होते. रेल्वे गाडी गेल्यानंतर लोकांनी या तरुणाला प्लॅटफॉर्मवर बसवले. या घटनेमुळे तरुण प्रचंड  घाबरला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...