आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Caught And Beaten By Wife On Stage While Attempting Second Marriage In Amritsar Punjab

10 दिवसांसाठी माहेरी गेली होती बायको, व्हाट्सअपवर मिळाला एक फोटो, महिला धावत गेली पोलिसांकडे, असे होते प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - पहिली पत्नी आणि दोन मुलांना माहेरी पाठवून हॉटेलमध्ये लपून लग्न करणाऱ्या पतीचा भांडाफोड झाला. 20 वर्षीय तरुणीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या व्यक्तीच्या लग्नात पत्नी पोहोचली आणि एकच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर त्याची जबर धुलाईदेखिल केली. हे पाहून नवरीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना धक्का बसला. तर नवरी स्टेजवरच रडायला लागली. हा व्यक्ती विवाहित असल्याचे माहितच नव्हते असे ती म्हणाली. जयमालाच्या वेळी काढलेला फोटो या कार्यक्रमाचा अखेरचा फोटो ठरला. त्यानंतर स्टेजवरूनच नवरदेवाला तेट तुरुंगात नेण्यात आले. पत्नी गीता कपूरचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरोधात कारवाई केली जात आहे. 


अनेक महिन्यांपासून सुरू होते अफेयर 
विक्कीचे लग्न 8 वर्षांपूर्वी कपूरथलाच्या गीता कपूरबरोबर झाले होते. दोघांना मुले आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून 32 वर्षीय विक्कीने 20 वर्षांच्या मुलीबरोबर मैत्री केली होती, आणि स्वतः अविवाहित असल्याचे सांगत तिला जाळ्यात अडकवले होते. त्याने या तरुणीशी लग्नाचा प्लान केला होता. दुसरीकडे या तरुणीला मात्र विक्की विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, हे माहितीच नव्हते. 


कोणीतरी व्हाट्सअॅप केले फोटो, ते पाहून विवाहस्थळी पोहोचली महिला 
विक्कीने कोणालाही समजू न देता लग्नाची तयारी पूर्ण केली होती. दोन दिवसांपूर्वीच विक्की गीताला म्हणाला होता की, तो कामाच्या निमित्ताने 10 दिवसांसाठी दिल्लीला जात आहे. तर तूही मुलांना घेऊन माहेरी जा, घरी एकटी राहून काय करणार. त्यामुळे ती माहेरी गेली होती. 


सोमवारी दुपारी विक्की मित्रांबरोबर सुमारे 50 जणांचे वऱ्हाड घेऊन अल्बर्ट हॉटेलमध्ये पोहोचला. सगळे डीजेवर नाचत होते. पैसे उडवले जात होते. त्याचदरम्यान कोणीतरी विक्कीच्या पत्नीला व्हाट्सअॅपवर लग्नाचे फोटो पाठवले. फोटो पाहून गीताच्या पायाखलची जमीन सरकली. तिला संशय बळावला. ती लगेचच पोलिसांत गेली आणि सर्वकाही सांगितले. पोलिसांनी महिलेबरोबर हॉटेल गाठले. त्याठिकाणी पोहोचताच तिने गोंधळ घालायला सुरुवात केली. विक्कीला धोक्याचा अंदाज येताच तो पळून जाऊ लागला. पण पोलिसांनी त्याला पकडले. गीताने त्याला तिथेच झापडा मारायला सुरुवात केली होती. पोलिसांनी विक्कीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...