आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोएडा - प्रख्यात नाटककार आचार्य अत्रे यांच्या गाजलेल्या "तो मी नव्हेच!' या नाटकाचा खलनायक लखोबा लोखंडेचा नवा अवतार दिल्लीत अवतरला आहे. सात वर्षांपासून तीन राज्यांच्या पोलिसांना त्याने चकमा दिला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा भामटा नवरदेव तरुण शर्मा (रा. गाझियाबाद) आणि त्याची कथित बहीण दुर्गांशू हिला (रा. डेहराडून) शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.
नवरदेव व त्याच्या बहिणीवर २५ -२५ हजारांचे बक्षीस जाहीर झाले होते. त्याशिवाय दोघांविरोधात यूपीतील मेरठ व नोएडा, पंजाबमधील चंदिगड व मध्य प्रदेशातील भोपाळ व इंदूर येथे महिलांशी लग्न करून त्यांच्याकडील लाखो रुपये लुटणे, व्यवसाय असल्याचे सांगून रकमेची फसवणूक करणे असे विविध गुन्हे दाखल झाले आहेत. या तरुणाने एका वर्षात तीन लग्ने केली. पहिले लग्न नोएडा येथे एप्रिल २०१७ मध्ये एका परिचारिकेसोबत केले होते. तिच्याकडील ४० लाख रुपये हडपले.
स्टॅम्प पेपरवर लिहून दिले, हुंडा घेणार नाही
तरुण शर्मा नोएडा व भाेपाळ येथील दोन्ही शहरांतील मॅट्रिमोनियल साइटवर व दहा रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हुंडा घेणार नाही, असे लिहून द्यायचा. एसएसपी डॉ. अजयपाल यांनी सांगितले, लग्न केलेल्या दोन तरुणींनी या आरोपीविरुद्ध अनैसर्गिक कृत्य केल्याचाही आरोप केला आहे. त्याच्या कथित बहिणीविरुद्ध कट रचणे आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुलायमसिंहांचा परिचित सांगून उकळले २५ लाख
तरुण आणि दुर्गांशू यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये मेरठच्या अजय त्यागी यांच्याकडून घर भाड्याने घेतले. तरुणने आपले न्यूज पोर्टल असल्याचे सांगून समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले. घरमालकाच्या मुलीशी लग्न ठरले. तेव्हा काही सामान विकत घ्यायचे आहे, असे सांगून १५ लाख रुपये उकळले. घरमालक कुटुंबासह साखरपुड्यास गेले तेव्हा त्याच्या कथित बहिणीसह राेख व दागिने मिळून २५ लाखांचा ऐवज घेऊन हे भामटे पसार झाले.
'डॉली की डोली'चित्रपट पाहून लुटण्याची कल्पना
चंदिगडनंतर दोघे भामटे नाेएडातील सेक्टर -७१ मध्ये येथे स्थायिक झाले. एसएसपी डॉ. अजयपाल यांनी सांगितले, नवरदेव बनून लुटण्याची कल्पना त्याला "डॉली की डोली' चित्रपट पाहून सुचली. दुर्गांशूने कथित भावाचे मॅट्रिमोनियल साइटवरून इच्छुक मुलींशी लग्न करून त्यांनाच लुटण्याची योजना आखली. डिसेंबर २०१६ मध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका परिचारिकेशी एप्रिल २०१७ मध्ये लग्न केले. त्यानंतर परिचारिकेच्या आईकडून नोएडात प्लॉट घेण्यासाठी ३० लाख व पत्नीच्या बँक खात्यातून दहा लाख रुपये उचलून हडपले.
भाेपाळमध्ये महिला बँक मॅनेजरलाही फसवले
भोपाळ येथे एका महिला बँक मॅनेजरशी जानेवारी २०१८ मध्ये लग्न केले आणि तिच्याकडील ८ ते १० लाख रुपये हडप केले. २०१८ मध्ये कथित बहिणीसह तो पळून गेला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.