आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google Map झूम केला तेव्हा BF ला किस करताना दिसून आली Wife; असा झाला हा चमत्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिमा - दक्षिण अमेरिकन देश पेरु येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून एका व्यक्तीने आपल्या चीटर पत्नीला नकळत पकडले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, पेरु येथे राहणारा एक विवाहित पुरुष सहज एका प्रसिद्ध पुलावर जाण्यासाठी शॉर्ट कटचा शोध घेत होता. त्याने यासाठी गुगल मॅप आणि स्ट्रीट व्यूची मदत घेतली. ठिकाण शोधताना त्याला तेथे एक महिला दिसून आली. महिला ओळखीची वाटत असल्याने त्याने फोटो झूम केला तेव्हा त्याला धक्काच बसला. ती त्याची पत्नी होती जी एका दुसऱ्या पुरुषाला किस करत होती. 


गुगल मॅपवर असे पकडले
- गुगल मॅप आणि स्ट्रीट व्यू या फीचर्समध्ये आपण कुठल्याही रस्त्याचे लाइव्ह चित्रण पाहू शकता. याच माध्यमाचा वापर करून पेरुतील एक माणूस प्रसिद्ध पुलावर जाण्यासाठी शॉर्ट कट शोधत होता. गुगलच्या फीचरप्रमाणे, त्याला मॅपसह रिअल टाईम फोटो दिसून आले. त्यापैकी एका फोटोमध्ये एक महिला एका पुरुषाला किस करत होती. त्याचवेळी सर्च करणाऱ्या व्यक्तीची नजर महिलेच्या कपड्यांवर गेली. 
- तिने पांढरा टॉप, जीन्स आणि हील्स घातल्या होत्या. लगेच डोक्यात विचार आला की आज घरातून निघताना आपल्या पत्नीने हेच कपडे घातले होते. त्याने वेळीच फोटो झूम करून पाहिला. ती त्याची पत्नीच होती. यानंतर एका मिनिटाचाही विलंब न लावता त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला फोन लावला. तसेच आपण तुला पकडल्याचे सांगितले. तेव्हा महिलेने आपले दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर असल्याची कबुली दिली आणि दोघांनी फोनवरूनच घटस्फोटाचा निर्णय घेतला. 


भारतात उपलब्ध नाही ही सेवा...
गुगल मॅप्स आणि स्ट्रीट व्यूचे फीचर अमेरिका, युरोप आणि इतर अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. यातून कुठल्याही ठिकाणाचे रिअल टाइम फोटो आणि व्यू पाहता येतात. यावरून 360 डिग्री व्यू सुद्धा पाहण्याची सुविधा आहे. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने देशात या सेवेवर बंदी लावली आहे. त्यामुळे, आपल्या देशात ही सेवा उपलब्ध नाही.

बातम्या आणखी आहेत...