आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसमध्ये मुद्दाम बर्फ सांडले, मग केले पडण्याचे सोंग; एका चुकीमुळे पकडला Insurance Fraud

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील न्यू जर्सीत काम करणाऱ्या एका 57 वर्षीय कर्मचाऱ्याला त्याच्या नाटकामुळे तुरुंगाची हवा खावी लागली आहे. अलेक्झांडर गोल्डइस्की असे त्याचे नाव असून त्याने केलेल्या नाटकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. सामान्य कामाच्या दिवशी तो ऑफिसला गेला. यानंतर कॅफेटेरियात जाऊन आपल्याच हाताने मुद्दाम बर्फ सांडला. यानंतर इकडे-तिकडे पाहून जणू पाय घसरल्याची अॅक्टिंग केली आणि खाली कोसळला. विशेष म्हणजे, आपल्या कार्यालयातील एखादा सहकारी येत नाही तोपर्यंत त्याने बेशुद्ध पडल्याचे सोंग रचले. हा व्हिडिओ गतवर्षीचा असला तरीही आता तो व्हायरल होत आहे.

 

विमा क्लेम करण्यासाठी रचला ढोंग
अलेक्झांडर गोल्डइस्की नावाच्या या व्यक्तीने हे संपूर्ण नाट्य विमा कंपनीकडून क्लेम मिळवण्यासाठी रचले होते. कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास रुग्णवाहिका येईल आणि उपचारासाठी येणारी रक्कम आपल्या खिशात जाईल अशी त्याची प्लॅनिंग होती. परंतु, ऑफिसमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीने त्याची पोलखोल केली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. 18 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता कार्यालयाने जारी केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...