आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांच्या मुलाचा खतना करण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन गेली आई, खोट्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झाले असे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम- इटलीत एका 2 वर्षांच्या मुलाचा खतना केल्यामुळे जीव गेला आहे. येथील मोन्टेरोंडो शहरात लागलेल्या एका रिफ्यूजी कँपमध्ये 2 वर्षीय मुलाचा जास्ती रक्तस्त्राव झाल्याने जीव गेला आहे. पोलिसांच्या तपासात कळाले की, मुलाची आई त्याचा खतना करण्यासाठी गेली होते, तेथे 66 वर्षाच्या एका व्यक्तीने स्वत: डॉक्टर सांगून चुकीच्या पद्धतीने मुलाचा खतना केला त्यात त्याला जीव गमवावा लागला.


- तपासात समोर आले की, जो व्यक्ती स्वत: ला डॉक्टर सांगायचा त्याच्यामुळे गेला जीव. जिथे हा खतना होत होता ते हॉस्पिटल एक एनजीओने सूरू केलेले आहे. पोलिसांनी खतना करणाऱ्या डॉक्टरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.


जुळ्या मुलांचा होत होता खतना
- पोलिसांच्या चौकशीत कळाले की, जुळ्या भांवांचा खतना केला जात होता, एका मुलाचा खतना झाला पण त्याला काही झाले नाही पण दुसरा मात्र वाचु शकला नाही.


ख्रिश्चन असून केला खतना
- मिडिया रिपोर्ट्सनुसार मुलांच्या आईने सांगितले की तिने इस्लामिक ट्रेडीशनसाठी मुलांचा खतना केला होता, पण ती ख्रिश्चन आहे. महिलेने सांगितले की, ती नायजीरियात राहते आणि तेथील इस्लामिक कल्चरमध्ये असे केले जाते.


बेकायदेशीररीत्या होत होता खतना
- मोन्टेरोंडो शहराच्या मेयरने या घटनेनंतर सांगितले, ''जे झाल त्यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करतो, मला माहित आहे की, इटलीत धर्माच्या नावावर दर वर्षी 5 हजार मुलांचे खतना केले जातात. हे मुलांच्या जीवासाठी धोक्याचे आहे आणि आम्ही यावर विचार करून पुढील पाउल उचलु.''

बातम्या आणखी आहेत...