आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Charged With Murder After Doing Wrong Circumcision Of 2 Year Old Boy, Unauthorized

2 वर्षांच्या बाळाचा खतना करण्यासाठी पोहोचली होती आई, स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणा-या 66 वर्षांच्या व्यक्तीने केला बेजबाबदारपणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम. इटलीमध्ये एका दोन वर्षांच्या बाळाचा खतना करण्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील मोन्टेरोंडो शहरात लावण्यात आलेल्या रिफ्यूजी कँपमध्ये 2 वर्षांच्या बाळाचा जास्त रक्त प्रवाह झाल्यामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी तपास केल्यावर कळाले की, बाळाची आई त्याचा खतना करण्यासाठी येथे घेऊन आली होती. येथील 66 वर्षांच्या व्यक्तीने बाळाचा चुकीच्या पध्दतीने खतना केला. यामध्ये त्या बाळाचा मृत्यू झाला. 


स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून करायचा खतना 
- रिपोर्ट्समध्ये समोर आले की, ज्या व्यक्तीने खतना केला तो स्वतःला डॉक्टर असल्याचे म्हणत होता. ज्या हॉस्पिटलमार्फत खतना सुरु होता हे हॉस्पिटल एका एनजीओ व्दारे संचलित आहे. पोलिसांनी खतना करणा-या व्यक्तीला अटक केली आहे. आता तो डॉक्टर असल्याचा पुरावा पोलिस तपासात आहेत. यानंतर त्याच्यावर हत्येचा खटला दाखल करण्यात येईल. 

जुळ्या बाळांचा केला जात होता खतना 
- पोलिस रिपोर्टनुसार ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याच्या जुळ्या भावाचा त्याच्या पहिले याच डॉक्टरने खतना केला. दूस-या जुळ्या भावाला सुदैवाने काही झाले नाही. पण दूस-या भावाचे जास्त रक्त प्रवाहामुळे मृत्यू झाला. 

 

ख्रिच्शियन असूनही केला खतना 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार बाळांची आई म्हणाली की, तिने इस्लामिक ट्रेडीशनसाठी मुलांचा खतना करुन घेतला होता, ती स्वतः ईसाई आहे. महिलेने सांगितले की, ती नाइजीरियामध्ये राहते आणि तिथे इस्लामिक कल्चरमध्ये असे केले जाते. येथील कल्चर फॉलो करण्यासाठी तिने असे केले. 

 

बेकायदेशीरपणे केले जात आहे खतना 
- मोन्टेरोंडो शहराचे मेयर या प्रकरणी म्हणाले की, "ही खुप दुर्दैवी घटना आहे. या धर्माच्या नावार फक्त इटलीमध्ये वर्षातून 5 हजार पेक्षा जास्त खतने केले जातात याची आम्हाला कल्पना आहे. यामध्ये जास्तीत जास्त हे बेकायदेशीरपणे केले जातात. हे लोक आरोग्याशी आणि त्यांच्या जीवाशी खेळत आहेत."

बातम्या आणखी आहेत...