आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल टॉवरवर चढून म्हणाला, मला पंतप्रधान करा नाही तर उडी मारेन! काहीही ऐकेना, मग पोलिसांनी लढवली अशी शक्कल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉवरवर चढलेला अब्बास आणि बघ्यांची गर्दी - Divya Marathi
टॉवरवर चढलेला अब्बास आणि बघ्यांची गर्दी

इस्लामाबाद - डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि मित्र राष्ट्रांकडे पैशांची भीक मागणारे पंतप्रधान पाहून पाकिस्तानी जनता किती अस्वस्थ आहे हे एका विचित्र घटनेतून समोर आले. इस्लामाबादमध्ये एका व्यक्तीला तर देशाच्या अर्थव्यवस्थेची इतकी चिंता वाटली, की तो चक्क मोबाईल टॉवरवर जाऊन चढला. त्याची मागणी एकच होती. आताच्या आता मला पंतप्रधान करा नाही तर उडी मारेन. काय सामान्य जनता आणि काय पोलिस.. पाकिस्तानच्या मीडियाने सुद्धा घटनास्थळी एकच गर्दी केली. सर्वच पाकिस्तानी माध्यमांवर या घटनेचे थेट प्रक्षेपण सुरू झाले. पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु, पंतप्रधान केल्याशिवाय खाली उतरणार नाही या मागणीवर तो ठाम होता.


पंतप्रधान करा, 6 महिन्यांत पाकिस्तानचे कर्ज फेडेन...
इस्लामाबादच्या ब्लू एरिया परिसरात मोबाईल टॉवरवर चढलेल्या या माणसाचे नाव मुहम्मद अब्बास आहे. राजधानीच्या उपगरीय भागात राहणाऱ्या अब्बासला पाकच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची चिंता होती. तो टॉवरवरूनच पोलिसांशी आणि नागरिकांशी संवाद साधत होता. ताबडतोब पंतप्रधान करा पाकिस्तानला आर्थिक मंदीतून बाहेर आणेल असे तो म्हणत होता. एवढेच नव्हे, तर पीएम झाल्यानंतर कशा प्रकारे 6 महिन्यांत पाकिस्तानचे कर्ज फेडून आर्थिक भरारी आणू असे दावे सुद्धा तो करत होता.


काहीही करा ऐकेना...
सुरुवातीला स्थानिकांची गर्दी झाली. त्याला लोकांनी समजावून खाली उतरण्यास सांगितले. यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. काही वेळातच माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा कॅमेरे आणि बूम घेऊन घटनास्थळ गाठले. सर्वांचा एकच प्रयत्न होता की कसे बसे या व्यक्तीला खाली उतरवावे. पोलिसांनी समजावून तर कधी धमकावून त्याला खाली येण्याचे आवाहन केले. परंतु, पंतप्रधान होण्यावर अडून बसलेल्या अब्बासने कुणाचे एक ऐकले नाही. मला पंतप्रधान करा. किंवा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून आश्वासन येऊ द्या. तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी मागणी त्याने लावून धरली.

 

#Maulajatt climbed at Mobile tower in Blue Area, #Islamabad,
Pakistani Flag laga k nechy aa gya,
Arrested by police. pic.twitter.com/IWY8C4WdNP

— Naya Pakistan (Khan Sarkar) (@NayaPak_2018) December 22, 2018

कॉमेडियन बोलावून काढला पंतप्रधानांचा आवाज
या सर्व घटनाक्रमानंतर पोलिसांना त्याच्या मागणीतूनच युक्ती सुचली. पंतप्रधानांचेच ऐकणार या मागणीवर ठाम असलेल्या त्या वेड्याची समजूत काढण्यासाठी पोलिसांनी पाकिस्तानच्या कॉमेडियनची मदत घेतली. शफात अली नावाचा पाकिस्तानी कॉमेडियन आपल्या मिमिक्रीतून ओळखला जातो. त्याला इस्लामाबादेत बोलावून पंतप्रधान इम्रान खान यांचा आवाज काढायला लावला. त्याने खान यांच्या आवाजात अब्बासशी संवाद साधला आणि त्याला व्यवस्थित समजावून पंतप्रधान करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तो खाली उतरण्यास तयार झाले. पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने त्याला खाली उतरवले आणि त्याचक्षणी अटक करून तुरुंगात डांबले.

 

 

बातम्या आणखी आहेत...